
कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या जीवावर उदार खेळ! बोगस कंपन्यांना संरक्षण देत शेतकऱ्यांची फसवणूक – हर्षल ठाकरे यांचा गंभीर आरोप.
- प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालु क्यासह अनेक भागांत काही कृषी अधिकारी स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने खत, बियाणे, संजीवके व बायो कीटकनाशके उत्पादक कंपन्या चालवत आहेत.
- हे अधिकारी शासकीय पदाचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे किसान सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे यांनी केला आहे.
- खास बाब म्हणजे हे निवेदन कृषी सहसंचालक, नाशिक विभाग यांना खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीसाठी सा क्री तालुक्यातील शेनपूर येथे आले असता प्रत्यक्ष त्यांच्या कडे सादर करण्यात आले.

- बोगस कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच.
- हर्षल ठाकरे यांनी सांगितले की, काही कृषी अधिकाऱ्यां नी आप ल्या किंवा नातेवाईकांच्या नावावर कंपन्या स्थाप न करून त्या कंपन्यांची उत्पादने जबरदस्तीने स्थानिक कृषी सेवा केंद्रांवर विक्रीस लावली आहेत.
- या उत्पादनांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून, यामुळे शेत कऱ्यांचे उत्पादन घटले असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.
- 200 रुपयांचे खते शेतकऱ्यांना 1000 रुपयांना…!
- खळबळजनक बाब म्हणजे या कंपन्यांमार्फत गुजरात येथून फक्त ₹200 दराने खरेदी केलेले खते शेतकऱ्यांना ₹1000 दराने विकले जात आहे. हा प्रकार थेट शेतकऱ्यां ची लूट असून, यामागे कृषी अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत.
- प्रयोगशाळा तपासणीतही संगनमताचे प्रकार
- कृषी अधिकारी केवळ काही ठराविक कंपन्यांचेच नमुने तपासणीसाठी पाठवतात, ज्या कंपन्यांनी त्यांना कोणता ही आर्थिक लाभ दिलेला नसतो.
- इतर कंपन्यांचे निकृष्ट उत्पादने जाणूनबुजून दुर्लक्षित केली जातात, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
- शेतकऱ्यांचे विदारक वास्तव
- शेतकरी आधीच हवामान, कर्जबाजारीपणा आणि बाजार भावाच्या अनिश्चिततेमुळे त्रस्त आहेत.
- कृषी अधिकारी जर अशा काळात शेतकऱ्यांना मदती ऐव जी लुटत असतील, तर शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत, असे हर्षल ठाकरे यांनी म्हटले आहे.
- प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे
- 1. संबंधित अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांची सखोल चौकशी करावी.
- 2. बोगस उत्पादनांची विक्री त्वरित थांबवावी आणि कंपन्यांचे परवाने रद्द करावेत.
- 3. दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी.
- 4. निवडक पद्धतीने नमुने घेऊन पारदर्शक प्रयोगशाळा तपासणी करावी.
- 5. संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











