
स्व.संजय रामचंद्र मासये यांच्या स्मरणार्थ जि.प.पू. प्रा. केंद्रशाळा ओझर नं १, कोंडिवळे गोतावडेवाडी, शाळा ओणी नं ३ या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शा ळा ओझर नं. १,कोंडिवळे गोतावडेवाडी शाळा तसेच जि. प शाळा ओणी नं ३ गोरुलेवाडी ता. राजापूर, जि. रत्नागि री आदी शाळांमध्ये दि. ११ जुलै २०२५ रोजी शालेय सा हित्य वाटप करण्यात आले.

- शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या प्राध्यापक म्हणून मुंबई ये थे कार्यरत असणारे मा. श्री. रवींद्र मासये सर व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने त्यांचे बंधू ‘स्व. संजय रामचंद्र मासये यांच्या स्मरणार्थ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- ओझर शाळा इयत्ता १ ली ते ७ वी, ओणी नं ३ शाळा इय त्ता १ ते ७ वी आणि कोंडिवळे गोतावडेवाडी इ.१ ते ४ म धील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.

- ज्या शाळेने आपल्याला मोठे केले त्या शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न आम्ही करत आहोत. असे मत यावेळी मासये सर यांनी व्यक्त केले.
- कार्यक्रमला उपस्थित त्यांचे बंधू मा. श्री. संदीप मासये सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले.
- तसेच शाळेच्या प्रगतीबद्दल सर्व शिक्षकांचे धन्यवाद व्यक्त केले.
- ओझर शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोरे गुरुजी,ओणी नं ३ चे मुख्याध्यापक शिवराम गोतावडे गुरुजी व कोंडिवळे गोता वडेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मुग्धा कुळये मॅडम यांनी मासये कुटुंबियांना खूप खूप धन्यवाद देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
- ओझर नं.२ शाळेचे मुख्याध्यापक श्री. बारड गुरुजी व श्री. बंदसोडे गुरुजी यांनी मासये कुटुंबाच्या दातृत्वाला सलाम केला.

- या कार्यक्रमाला गावचे सरपंच मा.श्री.विकासजी रेगे साहे ब, शा.व्य.समिती उपाध्यक्षा मा.सौ.मानसी गुरव, सदस्या मा.सौ.सुलताना हाजीर, मा.श्री.पाटील गुरुजी, माजी सरपं च मा. सौ.सोनल गुरव, श्री.चौगले गुरुजी, श्री.रामचंद्र गोरु ले तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गायकवाड गुरुजी यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











