
मॉडर्न हायस्कूलमध्ये वाहतूक नियमाचे धडे.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न हायस्कूल, यमुनानगर,निगडी येथे महा राष्ट्र शासनाच्या ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांवरील विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

- यावेळी वाहतुक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र अ हिरराव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले.
- वाहन परवाना,झेब्रा क्रॉसिंग वापर,बीआरटी मार्ग तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी वास्तवातील घटना आणि उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना निय मपालनाचे महत्त्व सांगितले.

- अहिरराव यांना मुलांनी प्रश्न विचारून आपल्या मनातील वाहतुकीबद्दल असलेल्या शंकांना योग्य उत्तराच्या माध्य मातून वाट करून दिली.
- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शा रदा साबळे होत्या. पर्यवेक्षक विजय पाचारणे यांच्या मार्ग दर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

- सूत्रसंचालन गंगाधर सोनवणे यांनी केले.पाहुण्यांचा परिच य शिवाजी अंबिके यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन खंडू खेडकर यांनी केले.
- या उपक्रमाचे विशेष कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसा यटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शा मकांत देशमुख, पुणे महापालिकेच्या नगरसेविका व सह कार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, नियामक मंडळ सद स्या व उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,शाळासमिती चे अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंखे आणि व्हिजीटर प्रमोद शिंदे यांनी केले.

- कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











