
सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत दिली शाळेला टिव्ही भेट ; शाळेचा टिव्ही चोरी झाल्याने दिली भेट.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :- वडगाव (पो स्टे) येथील केंद्रीय प्राथमिक मराठी शाळेतील एल सी डी स्मार्ट टिव्ही रविवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या रूमची कडी तोडून आत शिरले व ही टिव्ही चोरून नेली.
- सदर चोरीची रितसर तक्रार शिक्षकांनी वडगाव पोलीस स्टेशनला दिली असून वडगाव पोलीस भुरट्या चोरांचा कसून शोध घेत आहे.

- हा चोरीचा प्रकार घडल्याची घटना माहित होताच सामा जिक कार्यकर्ते गजानन चरडे व राहुल वानखेडे, प्रवीण ता कसांडे ग्राम विकास अधिकारी यांनी तात्काळ नवीन एल ई डी स्मार्ट टिव्ही शाळेला भेट दिली.
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने आ म्ही ही स्मार्ट टिव्ही शाळेला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.
- यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा ठाकरे, प्रवीण ताकसांडे, राहुल वानखडे पत्रकार विजय धपके नाजूका चारभे शिक्षण प्रेमी हजर होते वडगाव परिसरात भुरटे चो र सक्रिय झाल्याचे या चोरीवरून निष्पन्न झाले आहे.
- सरकारी शाळेच्या रूम मध्ये शिरून टिव्ही चोरण्या पर्यंत मजल गेल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






