
मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत कोंडतिवरे शाळेचे यश.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कोंडतिवरे या शाळेने उज्ज्वल यश संपादन केले.

- या शाळेतील चार विद्यार्थी केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा रायपाटण येथील स्व.सौ.अरुणा अनं तशेठ गांगण सभागृहात सत्कार करण्यात आला.

- यामध्ये प्रशिक गायकवाड (इ. ३ री), आरोही तरळ (इ. ४ थी), शिवम तरळ (इ. ५ वी ), अनन्या राजये (इ. ६ वी) या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
- त्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री.कुळये सर,सौ.गायकवाड बाई, श्री. रवंदे सर, श्री.राठोड सर तसेच शाळा व्यवस्थाप न समिती, पालक या सर्वांचे मार्गदर्शन भेटले.

- कार्यक्रमासाठी विविध शाळेतून आलेले विद्यार्थी व पाल क उपस्थित होते.

- यावेळी नवनियुक शिक्षक श्री. सुशांत तिवले सर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काय करावे याचा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











