घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’: नागरिकांना 858 शासकीय सेवा मोबाइल ॲपद्वारे मिळणार.

  • प्रतिनिधी : संदीप कारके :- छत्रपती संभाजीनगर जि ल्हा प्रशासनाने ‘सेवादूत’ हे मोबाइल ॲप लाँच केले आहे. या ॲपद्वारे नागरिकांना घरबसल्या विविध शासकीय सेवा मिळणार आहेत.
  • जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हे ॲप लोकां च्या सेवेत रुजू करण्यात आले.
  • ‘सेवादूत’ ॲपद्वारे महाऑनलाइन मार्फत दिल्या जाणाऱ्या ८५८ सेवा नागरिकांना घरपोच मिळू शकतील. नागरिकां नी प्लेस्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करून आधार क्र मांक व मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी.
  • त्यानंतर हव्या त्या सेवेचा तपशिल द्यावा. ही माहिती जि ल्ह्याच्या डेटासेंटरकडे पाठवली जाईल. तेथून ती नागरि कांच्या नजिकच्या सेवा केंद्राकडे अग्रेषित केली जाईल.
  • संबंधित सेवाकेंद्र चालक नागरिकाच्या घरी जाऊन आव श्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करेल. विहित का लावधीत संबंधित नागरिकास सेवा घरपोच दिली जाईल.
  • या सेवेसाठी नागरिकांना १०० रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहे. ही सेवा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आणि आजारी नागरिकांना अधिक उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
  • जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की प्रशासन नागरिकांना अधिकाधिक सेवा डिजिटल स्वरुपात उपल ब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
  • मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधार णा कार्यक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
  • कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उप जिल्हाधिकारी डॉ.सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांची उप स्थिती होती.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles