मॉडर्न प्राथमिक इंग्रजी माध्यमात रक्षाबंधन उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या प्री-प्रायमरी आणि प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल, यमुनानगर, निगडी येथे  राखीपौर्णिमेचा कार्यक्रम सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहाने पार पडला.
  • बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर रा खी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते.
  • निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं.हा सण मुलांनी शाळेच्या सुरक्षारक्षकांना राखी बांधून साजरा केला.
  • मुलांना आपल्या संस्कृतीचे,परंपरेचे तसेच आपली सुरक्षा करणारे सुरक्षा रक्षक आपल्यासाठी किती महत्वाचे आहे त हे कळावे म्हणून ही  संकल्पना शाळेचे चेअरमन प्रा.शा मकांत देशमुख व यशवंत कुलकर्णी यांनी सुचविली.
  • यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेल्या राख्या जवानांना पा ठविण्यात आल्या. रक्षाबंधननिमित्त राखीचे चित्र रंगवा हा उपक्रम घेण्यात आला.
  • तसेच नर्सरी ते इ.४थी च्या मुलींनी मुलांना राखी बांधून हा सण आनंदात साजरा करण्यात आला.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.४थी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले.
  • हा कार्यक्रम शाळेचे व्हिजिटर डॉ.प्रो.अतुल फाटक व मु ख्याध्यापिका तृप्ती वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सा हात पार पडला.
  • राखी पौर्णिमेची माहिती स्वाती देशपांडे यांनी सांगितली. तसेच या कार्यक्रमाचे संयोजन ज्ञाती चौधरी यांनी केले.
  • संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे व सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योस्त्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एक बोटे यांनी मुलांचे गोड कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles