कंडारी येथे काळभैरवनाथ मंदिरात चोरी; तपासाच्या मागणीसाठी ग्रामस्थ चढले मंदिराच्या शिखरावर…!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कंडारी येथील प्रसि द्ध श्री काळभैरवनाथ मंदिरात अज्ञात चोरांनी चोरी केल्या ची धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • या घटनेमुळे कंडारी गावासह परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरांचा तात्काळ छडा लावावा या मागणीसा ठी आज येथील ग्रामस्थांनी थेट मंदिराच्या शिखरावर चढू न अनोखे ‘शोले’ स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी येथील श्रद्धास्थान अस लेल्या काळभैरवनाथ मंदिराला चोरांनी लक्ष्य केले. मंदिरा त चोरी झाल्याचे उघडकीस येताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले.
  • या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी गावातील संतप्त नागरिक मंदिराच्या शिखरा वर चढले आहेत.
  • जोपर्यंत या चोरीचा छडा लागत नाही आणि दोषींना अट क होत नाही, तोपर्यंत आम्ही शिखरावरून खाली उतरणा र नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
  • “मंदिरामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तात्काळ तपासावे आणि चोरांचा शोध घ्यावा,” अशी मागणी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी केली आहे.
  • या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थ ळी दाखल झाले असून, नागरिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • मात्र, ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles