जागतिक मूलनिवासी दिनानिमित्य आलापल्ली येथे गोंडी नृत्य रॅली, सत्कार सोहळा व सांस्कृतिक स्पर्धा.

  • प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- पारंपरिक ग्रामसभा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मूलनिवासी (आदिवासी) दिव सानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्या त आले.
  • यानिमित्त पारंपरिक कलेचा जागर गोंडवाना संस्कृतीतून देण्यासाठी, तसेच एकोपा आणि आदिवासी अस्मितेचे म हत्व अधोरेखित करण्यासाठी गोंडमोहल्ला, एटापल्ली रो ड, पटेल मोहल्ला,बिरसा मुंडा चौक, टेकडी कॉलनी कुल दैवत, ते वीर बाबुराव शेडमाके मुख्य चौका पर्यंत भव्य गोंडी नृत्य रॅली काढण्यात आली.
  • ढोल-सनईच्या गजरात, पारंपरिक वेशभूषा व गोंडी लोक गीतांच्या तालावर नृत्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
  • नृत्य पथकांच्या रंगीबेरंगी सादरीकरणामुळे संपूर्ण परिस रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रॅलीत तरुण-तरु णींसह ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता.
  • कार्यक्रमात पेनवासी डॉ.किशोर नैताम यांच्या कुटूंबातील सदस्यांचे डॉ.सुमती नैताम यांच्या सत्कार करण्यात आला.
  • वैद्यकीय सेवेबरोबर सामाजिक चळवळ,त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व वारसा जप ला जावा, हा यामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
  • याचबरोबर गोंडी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्यामध्ये अनेक पथकांनी उत्साहाने सहभाग घेतला. पारं परिक वेशभूषा, नृत्याची लयबद्धता व सादरीकरण यांवर परीक्षकांनी विजेते ठरविले.
  • या प्रसंगी गोंडवाना सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांना मार्गद र्शन केले.
  • त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आदिवासी समा जाची परंपरा, संस्कृती आणि भाषा ही आपली खरी ओळ ख आहे.
  • जागतिक मूलनिवासी दिन हा फक्त उत्सव नाही, तर आप ल्या अस्तित्वाच्या लढ्याचा आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाचा दिवस आहे.”
  • वीर बाबुराव शेडमाके यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही तर विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.
  • स्पर्धेच्या शेवटी प्रथम क्रमांक बिरसा मुंडा ग्रुप, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद कन्या शाळा या पथकांनी पटकावला.
  • विजेत्या पथकांना मान्यवरांचा हस्ते बक्षीस वितरण कर ण्यात आले.तर प्रत्येक ग्रूपला प्रोत्साहनपर बक्षीस तसेच पेनवासी डॉ.किशोर नैताम फाऊंडेशन कडून पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
  • कार्यक्रमास गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, अहेरीचे पोलीस निरीक्षक विनायक एकरे, सरपंच शंकर मेश्राम, वीर बाबुराव स्मृती समिती अध्यक्ष भीमराव आत्राम, ईश्वर वेलादी, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष तोडसाम,पत्रूजी आत्राम, रावजी नैताम, बंडु‌ जी आत्राम, बाबुराव कोरेत,वासुदेव आलाम, रमेश मेश्राम, शंकर सडमेक, रघुपती सिडाम, प्रभाकर आत्राम, नानाजी सोयाम, अशोक तोडसाम, भिऊजी कोरेत,रमेश मडावी, लक्ष्मण मडावी,शंकर येरमे, सूत्रसंचालन विश्वनाथ वेलादी, प्रास्ताविक कैलाश कोरेत ,आभार मुकुंद सडमेक,यांनी मानले.
  • कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनोज सडमेक, कैलाश को रेत, संतोष अर्का, स्वामी वेलादी, दिलीप सिडाम,उमेश आ त्राम, योगेश कन्नाके, स्वरूप गावडे, रुपेश आत्राम, प्रतीक गेडाम, दौलत उरेत, सुनील कुमरे, सुरज पेंदाम,बंडू उरेत, अर्वीत्य इष्टाम, लकी सडमेक, संदीप उरेत, स्वरूप गावडे, दिपक कन्नाके,आकाश आत्राम, नागेश मेश्राम, अमन सड मेक,वासुदेव मडावी, बंडू सिडाम, महिला प्रतिनिधी मीरा बाई सडमेक, निर्मला कोरेत,सीताबाई सडमेक,अल्का को रेत, मंजू मडावी, ममता सुरपाम, ज्योती मडावी, चंद्रकला आत्राम, पार्वता सडमेक, प्रेमीला मडावी, संगीता इष्टाम, स रिता सिडाम, संगीता कन्नाके, आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles