
सुमन विद्यालय टेरव येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; सेवा सहयोग फौंउडेशन, मुंबई यांचा प्रेरणादायी उपक्रम.
- प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- जय भवानी एज्यु केशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशाले मध्ये नुकतेच सेवा सहयोग फौंउडेशन मुंबई, यांच्या सौज न्याने इयत्ता ८ वी व इयत्ता ९ वीच्या ७९ विद्यार्थ्यांना प्रत्ये की दफ्तर, ८ लाँग नोट बुक, आलेख वही व कंपास बॉक्स चे वाटप करण्यात आले.
- शिक्षणातील अडथळे दूर करून विद्यार्थ्यांना सक्षम कर ण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून, फौंउडेशनचा सेवा भाव समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी ठरतो आहे.

- वरील फौंउडेशनच्या वतीने आदिवासी पाड्यातील तसेच महाराष्ट्र व देशातील खेड्यापाड्यातील विविध शाळांमधी ल गरजू विद्यार्थ्यांना निःशुल्क शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.
- शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि आत्मविश्वासाची झळक स्पष्ट दिसून आली.
- जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने वरील फौंउडेशनचे विशेष आभार मानण्यात आले.
- सेवा सहयोग फौंउडेशनच्या सामाजिक बांधिलकीचा हा उज्ज्वल आदर्श भविष्यातही अनेक गरजू विद्यार्थ्यांचे जीवन उजळवेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
- सदर शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सर स्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवा नी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.अजित कदम त्याचप्रमाणे श्री.सुधाकर कदम यांनी विशेष प्रयत्न केले.
- सदर प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











