ह.भ.प.श्री.महादेव काशिबा दळवी बुवा संस्थेच्या वतीने वकृत्व स्पर्धेचे आयोजन.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे तिवरे येथील ह.भ.प महादेव काशिबा दळवी बुवा संस्थे च्या वतीने यावर्षी प्रथमताच विद्यार्थ्यांच्या वकृत्व कौश ल्याला चालना मिळावी.
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी व कृत्व स्पर्धेचे आयोजन माध्यमिक विद्यामंदिर ओझर तालु का राजापूर या प्रशालेत करण्यात आले होते.
  • ही स्पर्धा सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी शाळे च्या सभागृहात पार पडली आयोजकांच्या वतीने ही स्पर्धा दोन विविध गटात घेण्यात आले.
  • इयत्ता आठवी ते दहावीच्या गटासाठी पुढील प्रमाणे विष य होते.
  • १.समाज प्रबोधनांमध्ये संतांचे योगदान
  • २. माझ्या स्वप्नातला विकसित गाव.
  • ३. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
  • ४. व्यसन सोशल मीडियाचे
  • वरील वेगवेगळ्या विषयांमध्ये शाळेतील १२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये प्रथम क्रमांक तहूरा अल्लाउद्दी न हसोलकर इयत्ता दहावी द्वितीय क्रमांक पूर्वा पांडुरंग पळसमकर इयत्ता दहावी व तृतीय क्रमांक दिया मंगेश गुरव यांनी पटवला.
  • आयोजकांच्या वतीने विजयी स्पर्धकांना दिनांक १५ ऑग स्ट रोजी प्रशस्तीपत्र व रोख रकमेने गौरवण्यात आले.
  • स्पर्धेचे परीक्षण प्रशालेतील शिक्षक श्री चंद्रकांत पाटील व सौ पुनम कांबळे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मुरलीधर खान विलकर यांनी केले.
  • या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्री सुतार सर श्री अनिल दळवी श्री संदेश यादव श्री आशिष कोकरे व प्रशा लेची स्वराज्यसभा यांनी प्रयत्न केले.
  • दळवी बुवा सेवा संस्थेच्या वतीने प्रख्यात पखवाज वादक श्री प्रकाश पुंडलिक दळवी व सौ सुवर्णा दळवी उपस्थित होते शेवटी आभार मानून या स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles