
राजापूर सोल्ये हसोळचे प्रसिद्ध शाहीर प्रफुल्ल पुजारी यांची “आरती ओवाळू श्री गणराया” ही आरती यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षक ठरणार.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- तालुक्यातील सोल्ये हसोळ गावचे सुपुत्र, प्रसिद्ध शाहीर व सुमधुर आवाजाचे गायक प्रफुल्ल पुजारी यांनी स्वरबद्ध केलेले “ओवाळू आरती श्री गणराया” ही आरती लवकरच ‘आम्ही कोकणी कलाकार’ या चॅनलवर प्रसारित होणार आहे.

- शाहीर श्री पुजारी यांची ‘सजली ही धरणी’, जय जय लंबो दरा’ अशी गणपतीची विविध गीते व आरत्या गणेशभक्तां च्या पसंतीस उतरली आहेत.
- नुकतेच त्यांचे “आरती करु मोरया” ही आरती ‘आम्ही को कणी कलाकार’. या चॅनलवर प्रसारित झाली आहे वरील सर्व गीते प्रसिद्ध कवी आणि गीतकार श्री निलेश उजाळ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आहेत.
- शाहीर प्रफुल्ल पुजारी यांच्या येणाऱ्या प्रत्येक गाण्याची रसिक राजा आवर्जून वाट बघत असतो.

- गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारित होणा री आरती कोकणातील घराघरातून तसेच मुंबईतील गणेश मंडपातूनही वाजवली जाईल असा विश्वास गायक श्री प्र फुल्ल पुजारी यांनी व्यक्त केला आहे
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











