अकोला बाजार येथे तान्ह्या पोळा मोठ्या उत्साहात साजरा; ७० हजार रुपयाची जंगी लूट.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- मनुष्य जिवन हे पंच महाभु तेंनी बनलेले असून आयुष्य हे यातच विलीन होणार आहे.
  • याच पंचमहाभूतापैकी माती ही प्रामाणिकपणा,आधार,नि रागस, एकता, निस्वार्थभाव अश्या अनेक गुणांची शिकव ण देत असल्याने आपण आपल्या आयुष्यात असेच जगा वे या उद्देशाने पूर्वजांनी मातीचे लहान बैल बनवून तान्ह्या पोळाची सुरुवात केली.
  • याच तत्त्वाच्या आधारे अकोला बाजार येथे दि.२३ ऑगस्ट रोजी मेन लाईन मध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात तान्हा पोळा आयोजक मंडळ वॉर्ड क्रमांक दोन इंदिरा नग र अकोलाबाजार व समस्त गावकरी अकोलाबाजार तर्फे लहान चिमुकल्यांच्या आनंदासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वर्ष ५२ वे साजरे करत तान्ह्या पोळा बाशिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • या तान्ह्या पोळा स्पर्धेत एकूण ७० हजारांची जंगी बक्षिसां ची लहान चिमुकल्यांनी लूट केली असून या तान्ह्या पोळा बाशिंग स्पर्धेत अकोला बाजार परिसरातील विविध गावा तील चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला होता.
  • ही स्पर्धा सकाळी ११ वाजता सुरू होऊन या स्पर्धेत एकू ण २०१ मातीच्या बैल जोडी सजावट करून बाशिंग बांध लेले जोड्या चिमुकल्यांनी घेऊन आले होते.
  • तर काही चिमुकल्यांनी बाशिंग न बांधता जोड्या आण ल्या होत्या. त्यांना आयोजकांच्या वतीने भोजारा देण्यात आला.
  • या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक चिमुकल्या स्पर्धकां चा विचार करत या सर्वांसाठी नाश्ताचे व्यवस्था आशिष मनक्षे यांच्या तर्फे करण्यात आली.
  • या भव्य दिव्य तान्ह्या पोळ्या मध्ये कित्येक नागरिकांनी स्वयंस्फूर्त सढळ हाताने या चिमुकल्यांना भोजारा दिला.
  • गावातील समस्त युवकांची सामाजिक संस्था असलेली नवसंकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संपूर्ण लहान चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
  • या शालेय साहित्यामुळे चिमुकल्यांना अभ्यासात मदत व्हावी याच उदात्त हेतूने. या तान्ह्या पोळ्या बक्षीस वितर णाला माजी जिल्हा परिषद सदस्य रेणूताई शिंदे, संजय शिंदे पाटील,वडगाव जंगल पोलिस ठाण्याचे सपोनि विका स दांडे,पोलिस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • या तान्ह्या पोळ्यांचे प्रथम बक्षिस दिव्यांशु वेट्टी तर द्वितीय क्रमांकांचे बक्षिस पवन राजूरकर,तृतीय बक्षिस कार्तिक खंडरे, चतुर्थ बक्षिस शिवांश गावंडे, पाचवे बक्षिस गौरव गजभिये, सहावे वेदांशु कोपरकर तसेच यात प्रोत्साहनपर बक्षिसांची एकूण जंगी लूट २० हजारांची चिमुकल्यांनी लूट केली.
  • परीक्षक म्हणून मजीत भाई, अहमद भाई,कवडू भोयर, अ नंत जगताप शंकर ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पडली.
  • तान्ह्या पोळा आयोजनासाठी आयोजक मंडळ,गावातील समस्त युवक वर्ग,नागरिक आणि समस्त इंदिरा नगर वा सीने मोठी मेहनत घेतली.
  • या तान्ह्या पोळ्याला गावातील संपुर्ण नागरिकांसह महि लांनी व इतर परिसरातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली.हा तान्ह्या पोळ्या शांततेत पार पडावा यासाठी वडगाव जंगल पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles