
करमाळा पोलिसांनी पाठलाग करत तीन आरोपीं सह 13 किलो गांजा पकडला.
- प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- करमाळा पो लिसांनी केम कंदर रोडवर वाहनाचा पाठलाग करत 13 किलो गांजा सह एक कार व एक दुचाकी सह आठ लाख 11 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल पकडला आणि तीन आरोपींना जेरबंद केले.
- करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी माहिती देताना सांगितले की पोलीस उपनिरीक्षक सु शील कुमार पाखरे यांना गांजा वाहतूक संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती.

- एक सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी केम कडून कंदरच्या दिशेने एक बिगर नंबरची शिफ्ट कार व बिगर नंबरची ऍक्टिवा स्कूटर येताना दिसली बातमी प्रमा णे संशय आला.
- त्यावेळी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता ते थांब ले नसल्याने त्यांचा पाठलाग करून दोन्ही वाहनाची तपा सणी केली.
- सचिन नागनाथ निचाळ, (वय 26 रा. वेणीगा व तालुका माढा), यांच्या ताब्यातील बिगर नंबरची एक्टि वा गाडी चाडी गीत एक चिकटपट्टीने पॅक केलेले पाकीट व कारम धील सोन्या उत्तरेश्वर गोसावी सचिन सुरेश बावळे(रा. दोघे वेणेगाव तालुका माढा) यांच्या डिग्गीत चिकटपट्टीने पॅक केलेले पाच पाकीट मिळून आली.
- या सहा पाकिटात 13 किलो 450 ग्रॅम प्रति किलो अंदाजे पंचवीस हजार रुपये प्रमाणे तीन लाख 36 हजार 250 रुपये किमतीचा गांजा मिळुन आला.
- या प्रकरणात आरोपी सचिन निचाळ आकाश उर्फ सोन्या गोसावी सचिन सुरेश वाबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- सोन्या उत्तरेश्वर गोसावी याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











