
मॉडर्न हायस्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : पुणे : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युके शन सो सायटीच्या यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हाय स्कूलमध्ये हिंदी दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्या त आला.
- भारतात हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.

- या हिंदी दिनाच्या निमित्ताने शाळेत काव्य गायन स्पर्धा, जाहिरात लेखन स्पर्धा,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,नाट्यछटा स्प र्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
- हिंदी दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धांत इं जिनिअरिंग कॉलेजच्या प्रोफेसर नंदा कुलकर्णी तसेच नूत न विद्यालय एज्युकेशन सोसायटी गुलबर्गाच्या माजी मु ख्याध्यापिका मुक्ता कुलकर्णी,मॉडर्नच्या प्राचार्या शारदा साबळे,हिंदी विभाग प्रमुख सविता नाईकरे उपस्थित होत्या.
- हिंदी दिनानिमित्त नंदा कुलकर्णी यांनी विविध हिंदी साहि त्यिकांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी पाचवी च्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बधाई कार्ड प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला.
- कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमृता गायकवाड,जयश्री चव्हाण,कविता गायकवाड,सुनंदा खेडेकर, गंगाधर वाघमा रे,शिवाजी अंबिके यांनी परिश्रम घेतले.

- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख सविता नाई करे यांनी केले तर आभार हिंदी विषय शिक्षिका अमृता गायकवाड यांनी मानले.
- या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबो टे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे,विजय पाचारणे,राजू कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











