
दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी संतोष शिवदास आमले यांची निवड.
- प्रतिनिधी : पनवेल : प्रमोद तरळ :- दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित म्हामुणकर यांनी मीडि या क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेऊन मीडिया विभा गाच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी पनवेलचे रहिवासी व दैनि क युवक आधारचे संपादक श्री. संतोष शिवदास आमले यांची निवड करण्यात आली.
- त्यांच्या निवडीचे सिनेसृष्टीत तसेच सामाजिक क्षेत्रात मो ठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. कलाकार दिग्दर्शक यां च्याशी चांगला संपर्क असून सामाजिक क्षेत्र व पत्रकार क्षेत्रामध्ये दैनिक युवक आधारच्या माध्यमातून आमले यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून मीडिया क्षेत्रात संघटनेच काम वाढवण्यास मदत होईल.
युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “मीडिया विभा ग हा चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि पत्रकार यांच्यातील दुवा मानला जातो.- श्री.आमले यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्रभरातील माध्यम प्रतिनिधींना योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
- सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय संतोष आमले हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम, कला व सांस्कृतिक चळवळींमध्ये अग्रेसर आहेत.
- विविध संस्थांमार्फत त्यांनी युवकांना प्रोत्साहन दिले असू न पत्रकारिता आणि समाजकारण क्षेत्रात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
- दिग्दर्शक व अभिनेता विकास वायाळआमले यांची भूमि का आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. आमले म्हणाले, “दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या मीडिया विभागाचे महाराष्ट्र राज्याध्यक्षपद मिळणे ही मा झ्यासाठी मोठी जबाबदारी आहे.
- चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ तसेच पत्रकार यांना न्याय, सुविधा आणि योग्य मान-सन्मान मिळवून दे ण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
- महाराष्ट्रातील सिनेसृष्टीचा गौरव वाढवणे हेच माझे ध्येय असेल.”
- या नियुक्तीबद्दल श्री.आमले यांचे विविध मान्यवर,पत्रकार, कलाकार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून हार्दिक अभिनंद न करण्यात येत आहे.
- त्यांच्या कार्यकाळात मीडिया विभाग अधिक गतिमान हो ईल आणि दादासाहेब फाळके यांचे नाव उज्ज्वल ठेवणा ऱ्या चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत मोलाची भर पडेल, असा विश्वास आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











