साकुर्डे गावचे प्रसिद्ध उद्योजक प्रकाश बांद्रे यांचे निधन.

  • प्रतिनिधी : दापोली : प्रमोद तरळ :-तालुक्यातील साकु र्डे, जगदाळे वाडीतील ज्येष्ठ समाजसेवक, प्रसिद्ध उद्योज क प्रकाश जानू बांद्रे यांचे १८ सप्टेंबर रोजी मुंबईत चिरा बाजार येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.
  • त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मूळचे साकुर्डे जगदाळेवाडी (ता.दापोली)येथील रहिवासी असलेले प्रकाश बांद्रे हे पंचक्रोशीत दानशूर व्यक्ती म्हणून परिचित होते.
  • बालपणापासूनच संघर्षाचे धडे घेत शुद्ध हेतू व मनापासून परिश्रम करत त्यांनी शालेय वयापासूनच सामाजिक का र्यात स्वतःला झोकून दिले आणि अशक्य गोष्टीही साध्य करून दाखवल्या.
  • त्यांनी अनेक मंडळांच्या माध्यमातून सामाजिक आणि शै क्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता.
  • त्यांनी साकुर्डे जगदाळेवाडी येथे असलेली जमीन शाळे साठी दान केली होती यावरूनच त्यांच्या दानशूर पणाची कल्पना येते.
  • पंचक्रोशीतील गावातील विद्यार्थाना ते अनेक वर्षांचे शाले य साहित्याचे मोफत वाटप करत होते. यावरून त्यांची शिक्षणाप्रती असलेली तळमळ दिसून येते.
  • व्यावसायिक म्हणून उभारी घेताना त्यांनी इतरांना देखील साथ दिली. वाडीतील लोकांचे प्रश्न,वाद त्यांनी प्रेमाने मिटविले.
  • वाडीतील एकोप्याची वीण घट्ट करण्यासाठी त्यांनी पुढा कार घेऊन ओमकार कुणबी जनसेवा मंडळाची स्थापना केली.
  • काही वर्षे त्यांनी या मंडळाचे अध्यक्ष पद यशस्वीपणे भूष विले. आता देखील ते या मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून काम बघत होते.
  • मुंबईत यशस्वीपणे व्यवसाय करत असताना त्यांची नाळ कायम गावाशी जोडली गेली होती. विद्यार्थांना शालेय सा हित्याचे वाटप, शैक्षणिक प्रोत्साहन, सांस्कृतिक कार्यक्रमां मध्ये सहभाग घेऊन गावातील एकोप्याकरिता त्यांनी नेहमी पुढाकार घेतला.
  • पिंपळेश्वर नवतरुण विकास मंडळ, ओमकार कुणबी जन सेवा मंडळ तसेच साईबाबा मित्र मंडळ, चिराबाजार या मं डळांत ते अनेक वर्षे विविध पदांवर कार्यरत होते.
  • काही वर्षे ते महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिका री (सीईओ) म्हणून देखील काम करत होते. अशा या अ वलियाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढ णे अशक्य आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles