
मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा – राजापूर (रजि.) या सामाजिक संस्थेची नवीन कार्यकारीणी जाहीर.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबईतील ” पद्मभूषण तारा बाई मोडक शिक्षण केंद्र, दादर (पूर्व) येथे मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा-राजापूर ® संस्थेमार्फत वार्षिक सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
- संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष तांबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
- इतिवृत, कृती अहवाल आणि सन २०२४ ते मार्च २०२५ वार्षिक जमा-खर्च अहवाल सादर करून संमत करण्यात आला. वार्षिक अहवालानंतर आरोग्य विषयक चर्चा कर ण्यात आली.

- लांजा राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयीन आरोग्य सुविधा – आरोग्य विषयक पुढील धोरण या विषयावर स भेत उपस्थित सभासद यांच्या मार्फत आरोग्य विषयक पुढील धोरणात्मक चर्चा करण्यात आली.
- १) नुतनीकरणातील लांजा ग्रा.रुग्णालय “उपजिल्हा”श्रेणी वर्धित करणे.
- २)विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत मागणी.
- ३)डॉक्टर, रुग्णालयीन कर्मचारी निवासस्थाने व्यवस्थापन निधीसाठी शासकीय पाठपुरावा
- ४)सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राजापूरमध्ये उभा रण्याबाबत जोरकसपणे पाठपुरावा. आदी ग्रामीण आरो ग्य विषयाची धोरणात्मक आखणी आली.
- आयोजित बैठकीच्या अजेंडानुसार, पाच वर्षांसाठी (सन: २०२५ ते २०३०) नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
- त्यावेळी कार्यकारिणी निवड समितीचे अध्यक्ष म्हणून मा जी सल्लागार श्री विनोद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित अध्यक्ष: श्री. अजय तुकाराम मांडवकर (वड दहसोळ), सचिव: श्री.बलराम दाजी तांबे (निवोशी), खजि नदार: श्री.स्वप्नील गणपत मिरजोळकर (वडदहसोळ) यां च्या संस्थेच्या मुख्य पदाधिकारी म्हणून निवड झाली.
- नोंदणीकृत सदस्य म्हणून श्री. सुजय लक्ष्मण गितये (कळ सवली), श्री.रविंद्र भानू गितये (वडदहसोळ) श्री.महादेव हातणकर (वडदहसोळ), श्री.रविंद्र बाळू मटकर (चुनाको ळवण), श्री.सुभाष सुरेश तांबे (निवोशी), श्री.तानाजी भिवाजी तळेकर (कळसवली), श्री.संदीप रामचंद्र कांबळे (सडवली), श्री.राजेश जयवंत राघव (चुनाकोळवण) यांची निवड करण्यात आली आहे.
- मुख्य कार्यकारिणी अंतर्गत सरंचनात्मक पदभार देऊन अ नेकांना जबाबदारीसाठी लवकरच बैठक घेऊन अधिकृत पणे संपुर्ण विभागीय पदाधिकारी यांची नावे जाहीर होतील.
- पुढील ५ वर्षात संस्थेकडून लांजा-राजापूर तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयीन सुविधांच्या बळकटीकरणसाठी भरीव कामगिरी होईल असा विश्वास नव्या कार्यकारिणीने दिला.
- स्थानिकांना सरकारी रुग्णालयीन सेवेचा उत्तमरीत्या लाभ मिळावा यासाठी संघटना कटिबद्ध राहुन आरोग्य, शैक्षणि क आणि रोजगार या अंगांनी तालुक्याचा सर्वांगीण विका स व्हावा हे मूळ उद्दिष्ट ठेवत एकजुटीच्या विचारांनी जन हिताची कामे हाती घेण्याचा नवा सूर नवा ध्यास केला.
- हे करताना संस्थेची मूळ मूल्य जपून तळागाळातील लो कांमध्ये आपलेपण, बंधुभाव आणि समतेच्या विचारांवर संस्थेचे कार्य अधिक बहारदार करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











