रत्नागिरीतून मुंबईत एका तासात पोहचणे होणार शक्य, रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात….!

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- कोकणातील लोकांना आता मुंबईत एका तासात पोहचणे शक्य होणार आहे.
  • रत्नागिरी ते मुंबई असा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ हवाई प्रवाशी वाहतुकीने एका तासात पूर्ण होणार असून त्यासाठी रत्नागिरीतील हवाई तळाचे काम अंतिम टप्प्या त आहे. हे विमानतळ एप्रिल २०२६ पर्यंत कोकण वासि यांच्या सेवेला सज्ज होणार आहे.
  • राज्य सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यां च्या संयुक्त प्रयत्नातून रत्नागिरी विमानतळ लवकरच प्रवा शांसाठी सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
  • कोकणातील लोकांना सध्या मुंबई – रत्नागिरी – मुंबई असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रेल्वे किंवा रस्त्याने सुमारे सात ते आठ तासांचा प्रवास करावा लागतो.
  • मात्र आता हा प्रवास एका तासावर येणार आहे. रत्नागि रीतील नवीन विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई ते रत्ना गिरी असा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ एका तासा भरात पूर्ण होणार आहे.
  • रत्नागिरी विमानतळ प्रकल्प हा क्षेत्रीय संपर्क योजना अंत र्गत उभारला जात आहे. या विमानतळावर प्रवासी टर्मिन ल, धावपट्टी, टॅक्सीवे, एप्रन तसेच नेव्हिगेशन व सुरक्षा सुविधा उभारल्या जात आहेत.
  • या प्रकल्पासाठी अंदाजे प्रकल्पावर ५० ते ६० कोटींचा खर्च येत आहे. हे विमानतळ सध्या पुर्ण होण्याच्या मार्गा वर आहे.
  • कोकणातील प्रवाशांसाठी हा पहिला मोठा नागरी हवाई अड्डा असणार आहे. या विमान प्रवासाने प्रवाशांना केवळ वेळ वाचणार नाही, तर प्रवासाचा खर्चही कमी होणार आहे.
  • मुंबईला जाण्यासाठी व पुन्हा येण्यासाठी १८०० ते ३००० पर्यंत विमान तिकीट दर ठेवला जाणार आहे, जो सध्या रेल्वे किंवा बस प्रवासाच्या तुलनेत स्वस्त असणार आहे.
  • यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि कोकणात येणा-या व जाणा-या पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर व किफायतशीर होणार आहे.
  • समुद्रकिनारे, किल्ले, ऐतिहासिक वास्तू आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना थेट विमानतळा वर उतरता येणार असल्याने प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
  • रत्नागिरीत उभे रहात असलेल्या या विमानतळाचे उद्घाट न एप्रिल २०२६ पर्यंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
  • कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणाऱ्या या विमान प्रवासासाठी तिकीट बुकिंग, सुरक्षा तपासणी, फ्लाइट वे ळापत्रक व इतर सुविधा यावर अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
  • या नवीन विमानतळामुळे रत्नागिरीचा आर्थिक व पर्यटन विकास वाढीला लागणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles