
जपान दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री श्री.उदय सामंत यांचे कोंडगे गावच्या सुनबाई सौ.गायत्री कदम यांनी केले औक्षण.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा.ना.उदयजी सामंत जपान दौऱ्यावर असून त्यांचे औक्ष ण जपानमध्ये स्थायिक असलेल्या सौ.गायत्री स्वप्नील कदम यांना मिळाला.
- उद्योगमंत्री उदयजी सामंत सध्या कंपन्यांना भेटी देण्यासा ठी जपान दौऱ्यावर गेले आहेत. लांजा तालुक्यातील मौजे कोंडगे गावचे उच्च शिक्षित असलेले सुपुत्र स्वप्निल कदम हे आयटी इंजिनियर्स असून आपल्या कुटुंबासह जपान येथे स्थायिक आहेत.

- यावेळी सौ. गायत्री यांनी ना.सामंत यांचे औक्षण करण्या चे भाग्य लाभले मंत्रीमहोदयानी सुध्दा त्यांची आस्थेने विचारपूस करुन या दाम्पत्याचे कौतुक केले.
- सौ.गायत्री या कोंडगे गावचे विद्यमान सरपंच डॉ.सिताराम कदम यांच्या सुनबाई आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











