
बाधित सर्व पिकांचे पंचनामा करा : तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे.
- प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा तालुक्यात अ तिवृष्टी व महापूराने खरीप पिके, ऊस, साठवलेला कांदा, सोलर यंत्र, फळबागा नदीकाठच्या घरांचे मोठेनुकसान झाले.
- परंडा तालुक्यात महापूर व अतिवृष्टी ने झालेल्या सर्व बा धित पिकांचे पंचनामे करा यामध्ये एक ही पीक वगळू न का अश्या सूचना परंडा तालुका कृषी अधिकारी नानासा हेब लांडगे यांनी ग्राम स्तरीय समिती ला केल्या आहेत.
- त्यानुसार ग्राम स्तरीय समिती पंचनामे करत आहे सध्या पाऊस व नदीकाठी पाण्यामुळे शेतात उभे राहायचे झाले, तरी गुडघाभर पाय फसतात.
- त्यामुळे पंचनामे करणारे कृषी सहायक, ग्राम महसूल अधिकारी, गग्रामविकास अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- पडीक जमीन वगळता सरसकट पंचनामे केले जात आहेत. भुम तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले.
- त्यामुळे परंडा तालुक्यातील सर्व नद्यांना महापुराचे स्वरूप आले या महापुरात हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास निसर्गाने हिरावून घेतला. नदीकाठच्या पिकांसह पूर्ण शेती उद्धवस्त झाली.
- अनेकक कुटुंब बेघर झाली आहेत अनेक शेतकऱ्यांचे ज नावरांचे गोठे जनावरांसह वाहून गेले तर अनेक जनावरे पाण्यात बुडून जागीच मृत्यू पावली आहेत.
- एकीकडे शेतकरी पंचनामा कधी होणार याची प्रतीक्षा कर त असताना त्यात देखील नैसर्गिक अडथळा येत आहे.
- शेतात पीक उभे आहे, पण त्यात जायचे कसे? शेतात गुड घाभर चिखल असल्याने पंचनामा करणाऱ्या त्रिसदस्यीय समि तीपुढे आव्हान उभे राहिले आहे.
- तर पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आणखी व्यत्यय येत आहे तरी देखील शासकीय त्रिसदस्यीय समि तीने बांधा वर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
- परंतु पंचनामा करण्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळे सरकारने सरसकट पंचनामे करून लवकर मदत द्यावी. खरिपाने धोका दिला.
- रब्बी हंगामात पैसे नसल्याने काळी दिवाळी साजरी कर ण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे तातडीची मदत मिळावी अशी मागणी यावेळी होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











