
नवरात्रोत्सवानिमित्त दि. २९ सप्टेंबर रोजी विलवडे वाणीवाडी येथे लांजा तालुक्यातील दोन शाहिरांचा जंगी सामना.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-नवरात्रोत्सवाचे औचित्य साधू न आठवी माळ सोमवार दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी श्री देवी भवानी मंदिर, विलवडे, वाणीवाडी येथे लांजा तालु क्यातील नामांकित शाहीरांच्या जंगी सामन्याचे भव्य आ योजन करण्यात आले आहे.

- श्री.देवी भवानी विकास मंडळ, विलवडे (रजि.) मुंबई यां च्या वतीने शक्तीवाले शाहीर श्री बलराम व अमोल (श्री स त्यम गणेश मंडळ,तांबेवाडी मु.निओशी ता.लांजा विरुद्ध सुरांचे जादुगार तुरेवाले शाहीर श्री विकास लांबोरे मु. विव ली पो. केळंबे ता. लांजा या दोन्ही शाहिरांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे.
- ‘विलवडयाची आई भवानी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी च्या आठव्या माळीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्या चा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक श्री देवी भवा नी विकास मंडळ विलवडे यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











