
ट्रॉमा केअर रुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कंत्राटी लिपिकाचा ‘गॉडफादर’ शोधण्याचा खासदार रविंद्र वायकर यांचा मनपा प्रशासनाला आदेश.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- कुपर रुग्णालयात डिसें बर-जानेवारी २०२६ महिन्यात सीएसआरच्या माध्यमातून केमो सुविधा सुरू, ट्रॉमा रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये डाय लिसिसची सुविधा, ट्रॉमा रुग्णालयात डॉ.प्रवीण बांगर यांची नियुक्ती.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहे ब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय आणि कूपर रुग्णाल यातील अ नागोंदी कार्यपद्धतीबाबत वाढत्या तक्रारीची गंभीर दाखल घेत खासदार रविंद्र वायकर यांनी कूपर रुग्णालयात घेतले ल्या बैठकीत सिद्धार्थ व ओशिवरा रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे. ट्रॉमा येथे कॅथलॅब सुरू करण्यात यावी.

- अशा सूचना सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या. या बैठकीला मनपाचे अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते.
- येथील रुग्णसेवा आणि दैनंदिन कामकाजाचाही खासदार यांनी आढावा.या बैठकीला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य ) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णा लये) डॉ.(श्रीमती) नीलम अंद्राडे, नायर रुग्णालयाचे अधि ष्ठाता डॉ.शैलेश मोहिते, सहाय्यक आयुक्त अल्ले, माजी न गरसेवक व विभाग प्रमुख राजू पेडणेकर, अल्ताफ पेवेक र, स्वप्नील टेंबवलकर, संजय पवार, विष्णू सावंत, कमलेश राय, आत्माराम चाचे, राजुल पटेल, प्रतिमा खोपडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
- कुपर रुग्णालयात डिसेंबर-जानेवारी महिन्यात सी.एस.आ रच्या माध्यमातून केमो सुविधा सुरू करण्यात येणार अस ल्याची माहिती यावेळी अतिरिक्त मनपा आयुक्त वर्मा यां नी दिली.
- ट्रॉमा रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये डायलिसिसचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
- तर या रुग्णालयात केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठात डॉ. प्रवीण बांगर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
- कंत्राटी भरती मध्ये झालेला घोटाळ्याची चौकशी करण्या त यावी अशी मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी केली.
- वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीला एकाच ठिकाणी कामावर कसे ठेवू शकतात, असा प्रश्न खासदार वायकर यांनी उपस्थित केला.
- रुग्णालयात कंत्राटाची मुदत संपत असेल त्याच्या तीन महिने अगोदरपासून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी सुचना खासदार वायकर यांनी केली.
- डॉक्टर यांना ऑपरेशनचे टारगेट देण्यात यावे, ऑपरेशन लवकरात लवकर करावे, आदी सूचना खासदार यांनी केल्या.
- या बैठकीदरम्यान रुग्णालय प्रशासनामार्फत सांगण्यात आले की, डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबविण्याची कार्यवा ही प्रगतिपथावर आहे.
- त्यासोबतच एनआयसीयू आणि आयसीयू रुग्णशय्यांची संख्या वाढवण्यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्नशील आहे.
- तसेच केमोथेरेपी सुविधाही येत्या कालावधीत सुरू कर ण्यात येणार आहे. रुग्णांसाठी औषधाचा पुरेसा साठा उप लब्ध करून देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
- रुग्णालय परिसरात अधिकाधिक स्वच्छता ठेवण्यासाठी तसेच उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी ठोस उपाययोज ना करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनामार्फत देण्यात आली.
- रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद चांगल्या पद्धतीने घडावा यासाठी कर्मचारी वर्गाला संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- येत्या दिवसांमध्ये डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनाही संभा षण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

- रुग्णसेवा अधिकाधिक सुरळीत करण्याच्या अनुषंगाने आ णि रुग्णांसाठी सुलभ यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध आहे.
- समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन रुग्णसेवा अधि काधिक चांगल्या करण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नां ना पाठबळ द्यावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालि का आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी याप्रसंगी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











