
मुरली गावाजवळ दोन चारचाकींची भीषण धडक, तरुणांच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :- घाटंजी तालुक्यातील मुरली गावाजवळील तीव्र वळणावर दि.१ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला.

- या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी, स्थानिक तरुणांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

- मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट व्हीडीआय (एम.एच ३१ ई ऐ 3699) या गाडीत वर्धा येथील फलके कुटुंब प्रवास करत होते.

- तर थार (२५ बिएच ८४४६एच) मध्ये खांडवा (म.प्र.) येथी ल पटेल कुटुंब प्रवास करत होते. तीव्र वळणावर दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाली. धडकेचा आवाज होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.

- स्थानिक युवकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमीं ना वाहनातून बाहेर काढले व घाटंजी तसेच यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

- मुज्जू पटेल, टीनु शेंडे, यश अंदुरकर, धनु शेंडे, वैष्णव लां डगे आणि बालू डहाके या युवकांनी धाडसी मदतकार्य करत मोठा अनर्थ टाळला.

- दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या सहाय्याने पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मडावी पुढील तपास करीत आहेत.

- दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या वळणावर वारंवार अप घात घडत असल्याने प्रशासनाने तातडीने इशारा फलक व सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











