
अंतीम तारीख 6 नोव्हेंबर पर्यंत पदवीधर मतदार नोंदणी सक्रिय सहभागा घ्या.शिवसेना जिल्हाप्रमुख ( शिंदे गट वैधकिय मदत कक्ष ) उमेश सोनवणे यांचे आवाहन.
- प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :-परंडा-आगामी मराठ वाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पदवीधर मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे.
- या अभियानाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील सुशिक्षित वर्गाने लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून राज्याच्या धोरणनि र्मितीत आपला थेट वाटा उचलावा, असे आवादन शिवसे ना जिल्हाप्रमुख वैधकिय मदत कक्ष उमेश सोनवणे यांनी केले आहे.

- निवडणूक आयोगाने सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्या चा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे.
- या अनुषंगाने १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या काला वधीत नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे.
- धाराशिव जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या आठ जिल्ह्यांतील १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवी प्राप्त केलेले नागरिक नोंदणी स पात्र आहेत.
- जिल्ह्यात, महाविद्यालयांत जनजागृती मोहीम राबविण्या त येत आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार तानाजी सां वत सर व शिवसेना पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी एकत्रितपणे या अभियाना त कार्यरत आहेत.

- नोंदणी प्रक्रिया संबंधित तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जा ऊन पूर्ण करता येते. त्यासाठी पदवी प्रमाणपत्र, ओळखप त्र, आणि निवास दाखला सादर करावा लागतो.
- शासकीय यंत्रणा आवश्यक ते सहकार्य करत असून, परं डा येथील शिवसेना कार्यालय येथे मदत व मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











