
शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सौदागर यांना रोखण्यासाठी तीन मा.आमदार यांचे पुत्र एकत्र तर दोन मा. आमदार -काही प्रभागातील लढती चुरशीच्या होणार.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच परं ड्यात शिवसेना शिंदे पक्षाचे माजी मंत्री आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत गटाचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना रोखण्यासाठी मातब्बर नेते मंडळी एकत्र आली आहेत.
- त्यामुळे काही प्रभागातील लढती चुरशीच्या होतील असे चित्र दिसुन येत आहे.

- परंडा नगरपालिकेच्या एक नगराध्यक्ष २० नगरसेवक पदां साठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचा कार्यक्र म निवडणूक आयुक्त आयोग यांनी जाहीर केला आहे.
- त्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी सर्व प्रभागातील मतदारांच्या बैठका घेऊन उमेदवार निश्चित करीत आहेत.

- सौदागर यांना रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मा जी आमदार सुजितसिंह ठाकुर, राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार कै ज्ञानेशवर पाटील यांचे पुत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठा करे पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार कै चंदनसिंह सद्दीवाल, यांचे पुत्र सुभाषसिंह सद दीवाल, माजी आमदार कै नानासाहेब देशमुख मा.नगरसे वक यांना तिकीट मिळेल का (परंडा नगरसेवकांनी कोण ती कामे केली ? याचा हिशोब मतदार मागणार आहेत.

- अकार्यक्षम नगरसेवकांबद्दल मतदारांत नाराजी आहे. या नगरसेवकांनी पक्षाचे देखील काम केले नाही. उलट पक्षा ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

- त्यामुळे पक्षश्रेष्ठीदेखील त्यांच्यावर नाराज आहेत. अशा विद्यमान मा .नगरसेवकांनां तिकीट दिलेले नसल्याचे पक्षा च्या तिकिटावर निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी प क्षाला सोडचिट्टी दिली, तर काही नगरसेवक मतभेदामुळे पक्षापासून दूर गेले आहेत.

- त्यामुळे ते सोबत असून नसल्यासारखे आहे. काहीजण दुसऱ्या पक्षात उघडपणे गेले आहेत, योग्यवेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे)
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











