
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र कामगार सेनेची G4s कंपनीच्या कार्यालयात धडक.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी G4S सिक्युरिटी प्रा.लि. युरेका टॉवर,मालाड (प) ऑफीस येथे कंपनी व्यवस्थापनाचे मुख्य अधिकारी यांच्या सोबत कामगारांच्या प्रलंबित समस्या बद्ल चर्चा करण्यात आली.

- चर्चेत घेतलेले विषय पुढील प्रमाणे घेण्यात आले.यामध्ये मयत कामगार यांची ग्रॅज्युईटी पीएफ, व पेन्शन,२६ दिवस काम देण्याचे आश्वासन तसेच ERP चालु राहील याची शा श्वती,२o२४-२o२५ दिवाळी बोनस मधील तफावत तपासु न डिफरंन्स चेक करुन कामगार यांना दिला जाईल.
- प्रत्येक कामगार यांना यापुढे लेटरची पोच दिली जाईल. या सर्व विषयावर खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्म क चर्चा करण्यात आली.

- कंपनीच्या सर्व अधिकारी यांचे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
- या विषयासंदर्भात शिवसेना नेते लोकाधिकार समितीचे प्रणेते माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करुन माहिती दिली.

- असता यावर मी स्वतः व्यक्तिशः लक्ष घालुन कामगार यां ना न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











