
वडवलीतील श्रीमती उमाताई परुळकर विद्यालय मुख्याध्यापकपदी विलास शिंदे.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील वड वली येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक संचालित श्रीमती उमाताई परुळकर माध्यमिक विद्यालय वडवली या विद्या लयाच्या मुख्याध्यापकपदी विलास महादेव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीमती उमा ताई श. परुळकर मा.विद्यालय वडवली या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश साखळकर ३१ ऑक्टोबर रोजी त्यां च्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

- त्यामुळे रिक्त झालेल्या या मुख्याध्यापक पदी संस्थेच्या वतीने विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.
- वडवली गावातील वासुभाऊ शिंदे यांचे सुपुत्र असलेल्या व याच विद्यालयात शिक्षण घेतलेल्या विलास शिंदे यांची या विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल वडवली ग्रामविकास मंडळ मुंबई तसेच स्थानिक ग्रामस्थ व संस्थेच्यावतीने व अभिनंदन करण्यात आले आहे.
- त्याच विद्यालयात शिकलेले व गावातील एका शेतकऱ्याचे सुपुत्र असलेले विलास शिंदे हे या विद्यालयाचे मुख्याध्याप क झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- तर विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून गेली कित्येक वर्षे काम करणारे व शाळेच्या वैभवात भर घालणारे प्रकाश साखळकर पदावरुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांनाही वडवली ग्राम विकास मंडळ मुंबई व ग्रामस्थांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











