नांदगावच्या मोरये भगिनी गाजवतायत क्रीडा आणि कला क्षेत्र : स्मृतीचा अभिनय, विधीचा खेळ संस्मरणीय.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-कुटुंबात कोणतेही क्री डा किंवा कला क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना केवळ आवड म्हणून आम्ही या क्षेत्रात आलो आणि एक चांगला प्रवास करत आहोत.
  • यासाठी आम्हाला तशी समर्थ साथ आमचे आई बाबा, प्र शिक्षक आणि प्रायोजक यांनी दिली, असे प्रतिपादन मूळ‌ च्या नांदगाव वाशिनवाडी येथील असलेल्या आणि सध्या मुंबई येथे अभिनय क्षेत्रात प्रवास करणारी स्मृती आणि लॉन टेनिस खेळात यशस्वी ठरत असलेली विधी मोरये यांनी केले.
  • या दोन्हीही भगिनी गावी आल्या असताना बोलत होत्या.  मुंबई सारख्या ठिकाणी कोणतीही पार्श्वभूमी नसताना के लेली दमदार वाटचाल कौतुकास्पद आहे.
  • या प्रवासाबाबत बोलताना स्मृती म्हणाली की, उकळी या एकांकिकेने चांगली ओळख दिली. तसे मी अपघाताने अ भिनय क्षेत्रात आली असली तरीदेखील कामातील सातत्य आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अनेक ठिकाणी अभिन याची चुणूक दाखवता आली.
  • आवड म्हणून एक प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र अभि नय क्षेत्रात संधी मिळत गेली. महाराष्ट्रातील मानाच्या अने क एकांकिका स्पर्धेत अव्वल ठरलेल्या उकळी या एकांकि केने मानाच्या सवाई एकांकिका स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला.
  • तर अभिनयाचे उत्कृष्ट पारितोषिक स्मृती मोरये यांना मि ळाले. स्मृती मोरये यांच्या उत्तम अभिनयाबद्दल “पारंगत अभिनेत्री” हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
  • स्मृतीची कला कारकीर्द (चौकट) स्मृती मोरये हिने उकळी (एकांकिका), समर सेश है, लत (लघुपट) अशा विविध मा ध्यमातून स्मृतींची अभिनय कारकीर्द दमदार सुरू आहे.
  • तिच्या अभिनयाचे परेश रावल, विजय केंकरे, सिद्धार्थ जाधव, सुकन्या मोने अशा अनेक दिग्गज कलाकारांनी कौतुक केले आहे.
  • स्मृती सध्या रंगसंगती कलामंचच्या माध्यमातून कार्यरत असून भविष्यात तिच्या विविध कलाकृती पाहायला मिळ‌ णार आहेत.
  • स्मृतीची बहिण विधी ही श्रीमंत लोकांचा खेळ म्हणून प्र सिद्ध असलेल्या लॉन टेनिस खेळात आपले उत्कृष्ट खेळी ने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • गेली 5 वर्षे ती हा खेळ अत्यंत मेहनतीने आणि चिकाटीने खेळत असून मोठ्या प्रयत्नांनी तिने अनेकदा यश खेचून आणले आहे.
  • याबाबत विधी म्हणते की, एखाद्या गोष्टीत तुम्हाला आवड किती आहे? तुमचे सातत्य कसे आहे? आणि तुमची मेह नत कितपत आहे? यावर तुमच्या त्या क्षेत्रातील यश, वाट चाल ठरत असते.
  • त्यातही मुंबईसारख्या ठिकाणी लॉन टेनिस या परदेशी खे ळात आपले सातत्य राखण्यासाठी जबरदस्त मेहनत घ्या वी लागते.
  • मुंबई येथे झालेल्या विभागीय राज्यस्तरीय स्पर्धेत विधीने उपविजेतेपद पटकाविले. गेली ५ वर्षे विधी हा खेळ खेळ त आहे.
  • एवढ्या अल्प कालावधीत तिने अनेक ठिकाणच्या स्पर्धां‌ मध्ये आपले वर्चस्व राखले आहे. सध्या ती दादर येथील शिवाजी पार्क जिमखाना येथे सरावासाठी जाते.
  • आंतरराष्ट्रीय आणि खर्चिक खेळ (चौकट) लॉन टेनिस हा खेळ आंतरराष्ट्रीय खेळ असून तो सामान्य कुटुंबातील मु लांना आणि पालकांना आर्थिकदृष्ट्या पेलवत नाही.
  • शिवाय शहराशिवाय त्याला कुठेही सराव करता येण्यासा रखा नाही. तरीही विधी आपल्याकडील या खेळात कोणी ही नसूनही विधीने कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने या खेळात आपले उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे.
  • भरपूर व्यायाम (चौकट) टेनिसच्या या खेळास चापल्य ला गते. मागे, पुढे व बाजूला पळून, वाकून किवा उडी मारून ही चेडू टोलवावा लागतो.
  • त्यामुळे शरीरास भरपूर व्यायाम होतो. यासाठी ती दररोज धावणे, स्किपिग, वॉर्मअप नियमित करते. त्यामुळेच ती या खेळात आपले वर्चस्व गाजवत आहे.
  • डी.जी.रुपारेल महाविद्यालयात ती बारावीला शिकत अस ताना खेळ आणि अभ्यास या दोन्हींकडे तेवढ्याच गांभी र्याने लक्ष दिले.
  • त्यासाठी तिला अनुजा महेश्वरी या प्रशिक्षक असून जोगेश्व रीमधून पहाटे निघून सकाळी ६ वाजता दादरच्या शिवाजी पार्कला विधी जाते.
  • दररोजचा अभ्यास, खेळाचा सराव, महाविद्यालय आणि फिटनेस या सर्व गोष्ठी ती लीलया पेलवते. त्यासाठी तिचे आईवडील, प्रशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य मिळते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles