आलापल्ली येथील इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा.

  • प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- आलापल्ली येथील इन्स्पा यर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज, २६ नोव्हेंबर रोजी, संविधान दिन अत्यंत उत्साहाच्या आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
  • भारतीय संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यातील मूल्यांची रुजवात व्हावी, या उद्देशाने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमासाठी आलापल्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.विनोद अकनपल्लीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थि त होते.
  • शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे यथोचित स्वागत कर ण्यात आले. संविधानाप्रती आदर व्यक्त करत आणि कार्य क्रमाची आठवण म्हणून, शाळेच्या वतीने उपसरपंच अक नपल्लीवार यांना संविधानाची उद्देशिका (Preamble) भेट म्हणून देण्यात आली.
  • कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाचे मह त्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि एक नाग रिक म्हणून आपली कर्तव्ये यावर आपले मनोगत व्यक्त केले.
  • मुलांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली आणि संविधानाच्या मूल्यांवर प्रकाश टाकला.
  • शाळेचे मुख्याध्यापक स्वरूप गावडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संविधानानुसार जीवन जगण्याचे आणि देशा चे सुजाण नागरिक बनण्याचे आवाहन केले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्विमिंता अडगोपुलवार यांनी अ त्यंत प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोज नासाठी सारिका टाकलवार यांनी विशेष सहकार्य केले.
  • संविधान दिनाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन गेला आणि शाळेच्या वतीने भारतीय संविधानाला आदरां जली वाहण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles