रा.प.परंडा आगारात प्रवाशी राजा दिन साजरा करण्यात आला.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा आगार येथे प्रवाशी राजा दिन साजरा करण्यात आला. धाराशिव विभाग नियं त्रक श्री.अजयजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत दि. १०/१२/२०२५ रोजी प्रवाशी राजा दिन साजरा करण्यात आला.
  • यावेळी प्रवाशी प्रतिनिधी म्हणून प्रवाशी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री.किरणजी शहा, पत्रकार बंधू श्री.प्रमोदजी वेद पाठक, श्री.आनंदजी खर्डेकर, श्री.प्रशांतजी मिश्रा,शहाजी कोकाटे, बावची विद्यालयाचे आदर्श शिक्षक श्री.विकास वाघमारे यांनी प्रवाश्यांच्या समस्या व सूचना मांडल्या याव र योग्य उपाय योजना करून प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही.
  • तसेच बसस्थानक व एस.टी. बसेसची स्वच्छता सुधारणा करून बसेस वेळेवर धावतील याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन आगार व्यवस्थापक श्री.बालाजी मुळे साहेब यांनी दिले.
  • तसेच पॅकेज टूर्स अंतर्गत ४४ माणसांची ग्रुप बुकिंग झा ल्यास मागणीनुसार तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी बस सोडण्या त येईल.
  • तसेच गाणगापूर (तुळजापूर-अक्कलकोट) व कोल्हापूर आदमापूर तसेच ईतर तीर्थक्षेत्र ठिकाणी बस सोडण्यात येईल.
  • तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आगर प्रमुख श्री बालाजी मुळेसाहेब यांनी केले.
  • यासंदर्भात चौकशी करण्याकरिता आगारप्रमुख श्री.बाला जी मुळे (९२८४७८२४६५) वाह. निरीक्षक श्री.गो.अ. खरा टे साहेब (७३५०९३७०५४) व वाह. नियंत्रक श्री.हुसेनी साहेब (९०९७२७०४४५) श्री. पालके साहेब (९४२१८७४ ४८७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
  • यावेळी आगारात सर्व यांत्रिक, चालक, वाहक व प्रशास कीय कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्री.सचिनजी कांब ळे (प्रभारक) यांनी पाहुण्यांचे आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles