५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरवचे नेत्रदीपक यश.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :-तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिष द रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि श्री.विठ्ठलरा व जोशी चॅरिटीज ट्रस्ट डेरवण – सावर्डे, संचलित डेरवण इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १०, ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी डेरवण इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजि त करण्यात आले होते.
  • या प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरव या प्रशालेने उच्च प्राथ मिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
  • उच्च प्राथमिक गटात (इयत्ता ६ वी ते ८ वी) सुमन विद्याल य, टेरवच्या कुमारी विभावरी संतोष वास्कर (इयत्ता ८ वी) व कुमार हर्ष विजय गावडे (इयत्ता ८ वी) यांनी सादर केले ल्या “वृद्धांचा सोबती” या विज्ञान उपकरणाला चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
  • त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात (इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी) कुमारी तन्वी प्रदीप सागवेकर (इ यत्ता१०वी) व कुमार प्रथमेश मनोहर मांडके (इयत्ता ९वी) यांनी सादर केलेल्या “मल्टीपर्पज वायरलेस अलर्ट सिस्टी म” या उपकरणालाही प्रथम क्रमांक मिळाला.
  • या दोन्ही विज्ञान उपकरणांची पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
  • शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित दिमा खदार पारितोषिक वितरण समारंभात श्री.विठ्ठलराव जो शी चॅरिटीज ट्रस्ट डेरवण- सावर्डेचे संचालक व एस.व्ही.जे .सी.टी. प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष श्री.विकास वाला वलकर आणि पंचायत समिती चिपळूणचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी श्री.इरनाक साहेब यांच्या शुभहस्ते तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री.राज अहमद देसाई, श्रीमती अस्मा कौसर देसाई, श्रीमती सशाली मोहिते, माननीय डॉ. डोनाल, केंद्रप्रमुख श्रीमती गावडे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री.शैलेश सुर्वे, गणित मंडळाचे अध्यक्ष श्री.बिराप्पा मोट गी, श्री.आशुतोष गांधी, परीक्षण समिती प्रमुख श्री.राजेश इंगळे, श्री.सय्यद,श्री.शेले तसेच शिक्षण विभागातील अधि कारी, तालुका विज्ञान-गणित मंडळाचे पदाधिकारी, शिक्ष क व बालवैज्ञानिक यांच्या उपस्थितीत सुमन विद्यालय, टे रवचा विशेष सन्मान करण्यात आला.
  • सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये यश संपादन क रणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री. अमो ल टाकळे तसेच मुख्याध्यापक श्री.मंदार सुर्वे यांचे मार्गद र्शन लाभले. डेरवण येथे आयोजित ५३ व्या तालुकास्तरी य विज्ञान प्रदर्शनात दोन्ही गटांत प्रथम क्रमांक मिळवणा ऱ्या यशवंत विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.विकास कदम, सचिव श्री. योगेश कदम, खजिनदार श्री.अजित कदम त सेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद, पालक, ग्रामस्थ शि क्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढी ल जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles