श्री.कोंडवाडी हनुमान मंडळ संलग्न जय बजरंगबली कलापथक पन्हाळजे आयोजित जय बजरंगबली चषक २०२५ उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : दिवा : प्रमोद तरळ :- श्री.कोंडवाडी हनुमान मंडळ संलग्न जय बजरंगबली कलापथक मु.पो. पन्हाळ जे,‌ कोंडवाडी, ता.खेड,जि.रत्नागिरी आयोजित “जय बज रंग बली चषक २०२५” यूट्यूब लाईव्ह भव्य टेनिस ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी श्री.भगवान पाटील क्रीडांगण सपरा मैदान, दातिवली-दिवा (पूर्व), मुंबई येथे अगदी यशस्वीरित्या प्रति वर्षी प्रमाणे निर्विवाद पणे संपन्न झाले.
  • सदर स्पर्धेत खेड आणि दापोली तालुक्यातील अनेक गा वातून वेगवेगळ्या वाडीतील एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला होता,सर्वांनी शिस्तप्रिय खेळी करत मंडळाला छान सहकार्य केले.
  • या नियोजनात श्री.कोंडवाडी हनुमान मंडळाची संपूर्ण कार्यकारणी आणि सभासद मंडळी यांनी हजेरी लावली होती.
  • तसेच पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते,मंडळाचे हित चिंतक आदी मान्यवर उपस्थित होते.
  • “बजरंग बली चषक २०२५” वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला काळकाई क्रिकेट संघ कर्जी, गवळवाडी तर राजवेल रायडर्स राजवेल कुणबीवाडी क्रिकेट संघ या संघाला उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं.
  • अनुक्रमे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले ते नवनिर्माण क्रि केट संघ होडखाड – दत्तवाडी तसेच या स्पर्धेचे मालिकावी र म्हणून अजित धनावडे (कर्जी गवळवाडी संघ),उत्कृष्ट फलंदाज सिद्धार्थ येद्रे (कर्जी गवळवाडी संघ ) आणि उत्कृष्ट गोलंदाज जय निकम (राजवेल रायडर्स) खेळाडूंची निवड करण्यात आली.
  • सदर स्पर्धेच उत्कृष्ट समालोचन सुदर्शन जाधव,दिगंबर भोवड यांनी केले तर स्पर्धेची उत्कृष्ट पंचगिरी श्री.निलेश धामणे,विजय सर यांनी केली.
  • या स्पर्धेत सहभागी झालेल्या २० संघाचे आणि खेळाडूंचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
  • सर्व खेळाडूंच्या मोलाच्या सहकार्याने आणि जय बजरंग बली कलापथकच्या पदाधिकारी,सभासद यांच्या मेहनती ने जय बजरंगबली चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा आनंदात संपन्न झाली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles