
करमाळा तालुक्यात राजकीय वारे वाहू लागले; जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली उद्या समर्थकांचा भव्य मेळावा.
- प्रतिनिधी : मुजंम्मील पटेल :-आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमा ळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
- तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ माजी आमदार श्री.जयवंतरावजी जगताप (साहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, ५ जानेवारी रोजी समर्थकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
- या मेळाव्यामुळे तालुक्यात आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

- निवडणुकीच्या रणनीतीवर होणार विचारविनिमय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
- करमाळा तालुक्यात जगताप गटाची मोठी ताकद आहे. हीच ताकद एकवटण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत विजयाची रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचे आयोज न करण्यात आले आहे.
- या मेळाव्यात जयवंतराव जगताप साहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- मेळाव्याचे तपशील:
- अध्यक्ष:मा.आ.श्री.जयवंतरावजी जगताप (साहेब) दिनां क: सोमवार, ५ जानेवारी २०२६
- वेळ: दुपारी ठीक १:०० वाजता
- स्थळ: यशोदीप मंगल कार्यालय, निलज रोड, करमाळा.
- कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
- या मेळाव्यासाठी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून जगताप समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
- ‘आगामी निवडणुकीत जगताप गटाची भूमिका काय असे ल?’ आणि ‘उमेदवारीबाबत काय चर्चा होईल…?’ याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- “आपल्या नेत्याच्या विचारांनी प्रेरित होऊन निवडणुकी च्या मैदानात उतरण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
- तरी या मेळाव्यास सर्व समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वती ने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











