वाटूळ येथील शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून व अमोल चव्हाण यांच्या पुढाकाराने पब्लिक स्पीकिंग कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-(दि. २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ | वेळ : रात्री ७.३० ते ९.३०) शिवप्रति ष्ठानच्या माध्यमातून व अमोल गजानन चव्हाण यांच्या प्र यत्नातून गावातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासा ठी व संवाद कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने दि. २६ ते २८ डिसेंबर २०२५ या तीन दिवशी रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत तीन दिवसांची पब्लिक स्पीकिंग कार्यशाळे यश स्वीरीत्या आयोजित करण्यात आली.
  • या कार्यशाळेचे उद्घाटन शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सुहास चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
  • उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, वाचनाची सवय आणि प्रभावी संवाद कौशल्याचे महत्त्व आत्मसात करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
  • या उपक्रमासाठी अमोल गजानन चव्हाण यांनी गावात इं टरनेट सुविधेची व्यवस्था करून दिल्यामुळे ऑनलाइन स्वरूपात कार्यशाळा राबविण्यास मोलाची मदत झाली.
  • तसेच अजय चव्हाण यांनी आपले राहते घर कार्यक्रमासा ठी उपलब्ध करून दिले.
  • कार्यशाळेच्या यशस्वी नियोजनासाठी बंधू चव्हाण व प्र शांत चव्हाण यांनी गावातील होतकरू विद्यार्थी तसेच त्यां च्या पालकांशी संपर्क साधून उपक्रमाबाबत माहिती दिली.
  • त्यांच्या प्रयत्नांमुळे व सहकार्यामुळे ही कार्यशाळा यशस्वी रीत्या पूर्णत्वास गेली. या कार्यशाळेत वाचनाचे महत्त्व वि शेषत्वाने अधोरेखित करण्यात आले.
  • नियमित वाचनामुळे शब्दसंपदा वाढते, विचार अधिक स्प ष्ट होतात आणि प्रभावीपणे मांडणी करण्याची क्षमता विकसित होते, असे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
  • यासोबतच भाषण तसेच संभाषण कसे करावे, मुद्देसुद व आशयपूर्ण भाषण कसे मांडावे, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
  • भाषण करताना आवाजाचा योग्य वापर कसा करावा, आ त्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी आवाज नियंत्रित करण्या साठी कोणते श्वसन व आवाजाचे व्यायाम करावेत, याचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना करून दाखवण्यात आले.
  • त्यामुळे विद्यार्थ्यांना भाषण करताना आवाजातील स्पष्ट ता, ठामपणा व प्रभाव याचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले.
  • कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अ भिप्रायात सांगितले की, या उपक्रमामुळे स्टेजवरील भीती कमी झाली असून आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे.
  • अनेक विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच शाळा, स्पर्धा व इतर सार्वजनिक मंचांवर बोलताना या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा निश्चित च उपयोग होईल, अशी भावना व्यक्त केली.
  • या कार्यशाळेत कु. मुद्रा चव्हाण, देविश चव्हाण, निमिषा चव्हाण, रुद्र चव्हाण, इश्वरी चव्हाण, मृमई चव्हाण, श्रवण गुरव व मैथिली गुरव यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
  • कार्यशाळेच्या तांत्रिक यशासाठी विराज चव्हाण तसेच सुबोध वळंजू यांनी आपल्या संगणकीय ज्ञानाच्या आधारे प्रोजेक्टर व संगणकाची यशस्वी जोडणी करून ती कार्य शाळेसाठी उपलब्ध करून दिली.
  • त्यांच्या सहकार्यामुळे ऑनलाइन कार्यशाळा सुरळीतपणे पार पडली.
  • या उपक्रमाचे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेच्या शिक्षकां चे आयोजक, शिवप्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्व क आभार मानण्यात आले.
  • त्यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नव्या दृष्टीने विचार करण्याची प्रेरणा मिळाली.
  • एकूणच शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून व अमोल चव्हाण यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेली ही पब्लि क स्पीकिंग कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैयक्तिक व भविष्यातील व्यावसायिक जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून,अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles