
मॉडर्न हायस्कुलमध्ये मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल मध्ये १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.

- यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीपर चित्रकला तसेच निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.

- या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक विभागाचे अधिकारी दमयंती पवार,दिनेश जगताप,अमोल फुंदे,रवींद्र बोरकर,सारिका गहाळ,दिपाली बिरारे,धनंजय गव्हाणे,पर्यवेक्षक विजय पाचारणे आदी उपस्थित होते.

- यावेळी निवडणूक अधिकारी अमोल फुंदे यांनी विद्यार्थ्यां नी पालकांना हट्ट करून मतदान करण्यास सांगितल्यास मतदानाचा टक्का वाढेल असे सांगितले.
- तर लोकशाही अधिक सदृढ आणि बलशाली होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे सांगितले.

- शालेय विद्यार्थ्यांनी यमुनानगर परिसरात जागृती फेरी काढून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.
- कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मतदान अधिका री शिवाजी अंबिके,कविता गायकवाड,जयश्री चव्हाण, म नीषा बोत्रे,वृषाली सलगर यांनी परिश्रम घेतले.

- उपक्रमाचे कौतुक मुख्याध्यापिका शारदा साबळे,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवा ह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मान सिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,राजीव कुटे यांनी केले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











