इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, आल्लापल्ली येथे तीन दिवसीय क्रीडा सत्राचे उद्घाटन संपन्न : मान्यवरांची उपस्थिती.

  • प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- आल्लापल्ली येथील इन्स्पा यर मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित करण्या त आलेल्या तीन दिवसीय क्रीडा सत्राचे उद्घाटन नुकतेच उत्साही वातावरणात संपन्न झाले.
  • याप्रसंगी परिसरातील मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या सं ख्येने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सावि त्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी.डी.मेश्राम उपस्थित होते.
  • त्यांच्यासोबत सह-उद्घाटक म्हणून त्याच महाविद्यालयाचे लिपिक एच.एस.आदे यांनी व्यासपीठाची शोभा वाढवली.
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मी डियम स्कूलचे मुख्याध्यापक स्वरूप गावडे होते.  मान्य वरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व क्रीडा ज्योत पेटवून सत्राचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
  • यावेळी बोलताना उद्घाटक पी.डी.मेश्राम यांनी विद्यार्थ्यां च्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
  • अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक स्वरूप गावडे यांनी शाळेच्या क्रीडाविषयक उपक्रमांची माहिती दिली आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
  • कार्यक्रमाचे संचालन स्मिता अडगोपुलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राची गर्गम यांनी केले. हे क्रीडा सत्र यश स्वी करण्यासाठी सारिका ताकलवार यांनी विशेष सहका र्य केले.
  • या तीन दिवसांत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्या त आले असून, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles