
दिवा येथे १८ जानेवारी रोजी गुरु माऊली नमन नाट्य प्रोडक्शनच्या बहुरंगी नमनाचा कार्यक्रम.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- पूर्वजांनी पिढ्यानपि ढ्या जीवापाड जपलेल्या नमन लोककलेचा प्रचार प्रसार, जतन, संवर्धन व्हावा पुढच्या पिढीला या कलेची माहिती व्हावी या उद्देशाने गुरु माऊली नमन नाट्य प्रोडक्शन मुंब ई या संस्थेची स्थापना केली.
- राजापूर तालुक्यातील कलावंत, निर्माता विजय चौगुले सु त्रधार आणि चौके गावचे सुपुत्र, गीतकार प्रदिप उजवकर, निर्मिती निलेश लाड यांची आहे.

- नमन कलेचा सर्वदूर प्रसार व्हावा यासाठी हे प्रोडक्शन काम करणार आहे.
- या नमन नाट्य प्रोडक्शनचा दि. १८ जानेवारी २०२६ रो जी सायं ६ वा. आगासन गेट शंकर मंदिर, कान्होबा नगर दिवा पूर्व येथे नमनाचा कार्यक्रम होणार आहे.
- या नमन मंडळाचे विशेष आकर्षण म्हणजे सुमधूर गीते वि नोदी नटखट गवळण तसेच ह्रदयस्पर्शी अभिनयासोबत नृत्याचा आविष्कार प्रेक्षकांना भावणार आहे.
- या कार्यक्रमाला नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलावंत मंडळी, दिग्दर्शक गायक उपस्थित राहणार आहेत.
- कोकणातील या नमन लोककलेच्या कार्यक्रमाला उपस्थि त राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे व आपणही कलेचा आनंद घ्यावा असे आवाहन गुरु माऊली नमन नाट्य प्रोड क्शनच्या वतीने निर्माते श्री विजय चौगुले, श्री प्रदिप उजव कर, निलेश लाड तसेच व्यवस्थापक व कलाकार प्रेम उज वकर,जयदेव जोगले, आशिष गुरव, महेश डोंगरकर, आदि त्य निबदे, संदेश आग्रे,सुरज गुरव,साक्षी रुमडे,सानिका पाटोळे, अथर्व पाटोळे व सल्लागार समीर पाटोळे यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











