
शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षेत मॉडर्न हायस्कूलचे यश.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न हायस्कूल यमुनानगर निगडी येथील वि द्यार्थ्यांनी शासकीय ग्रेड चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
- विद्यालयाच्या दोन्ही परीक्षांचा निकाल ८७ टक्के लागला असून,महाराष्ट्र राज्य कला शिक्षण संचालनालयाने घेतले ल्या एलिमेंटरी परीक्षेत कु.सिद्धी प्रसाद कणसे हिने राज्य यादीत २९ वा क्रमांक पटकावला आहे.

- तसेच सिद्धी कणसे हिचा वस्तू चित्रामध्ये राज्यातून ३ रा व स्मरण चित्रात राज्यातून ८ वा क्रमांक मिळवला आहे. एलिमेंटरी परीक्षेत ३१ पैकी ७ विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळाली आहे.
- तसेच ९ विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाली आहे.इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत ७ विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षिका कुसुम पाडळे,मीना अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
- यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशालेच्या मुख्याध्यापिका शा रदा साबळे,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,का र्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ निवेदिता एकबोटे, शाळा स मिती अध्यक्ष प्रा.मानसिग साळुंखे,व्हिजिटर प्रमोद शिंदे, सदस्य राजीव कुटे, पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











