
शिरवली शाळेची विधी विजय धुर्ये चालली नासा व इस्त्रो भेटीला.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :-रत्नागिरी जिल्हा परि षदेने नासा, इस्रो भेटीसाठी घेतलेल्या अंतिम परीक्षेत जि ल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शिरवलीची विद्या र्थिनी कुमारी विधि विजय धूर्ये हिने उज्वल यश प्राप्त क रून लांजा तालुक्यातून नासा व इस्रो या अंतराळ संशोध न संस्थांना भेटी देण्यासाठी जाण्याचा बहुमान पटकवल्या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- यापूर्वी या शाळेचे दोन विद्यार्थी नासा, इस्रो संस्थांना व एक विद्यार्थीनी इस्रो संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाली होती.
- शिरवली शाळेने सलग चौथ्या वर्षी या परिक्षेत उज्वल य श प्राप्त केल्याबद्दल शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.

- विधी धुर्ये हिला मार्गदर्शन करणारे तिचे वर्गशिक्षक श्री. उमेश केसरकर,पदवीधर शिक्षिका सौ.श्रद्धा दळवी,मुख्या ध्यापक श्री.नंदकुमार गोतावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
- पालकांचे उत्तम सहकार्य मिळाले विधी धुर्ये हिने मिळव लेल्या यशाबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षक, पालक यांचे पंचक्रोशीतून तसेच युवक मंडळ शिरवली, मौजे शिरवली ग्राम विकास मंडळ मुंबई समस्त ग्रामस्थ शिरवली यांनी जाहीर अभिनंदन केले आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











