
सैन्यदिन संचलनात मॉडर्न इंग्रजी माध्यमाचा प्रथम क्रमांक.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-भारतीय सैन्य दिनाच्या निमि त्ताने देशाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या शूर जवानांच्या शौर्य, त्याग आणि शिस्त यांना मानवंदना देण्यासाठी संचलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
- मस्केटियर्स यूथ फाउंडेशनच्या पुढाकाराने स्पर्धा संपन्न झाल्या.

- यावेळी फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र संजय अहिरे,कर्नल नितीन रुमाळे,प्रताप भोसले,शुभांगी सरोटे, स्मिता माने उपस्थित होते.
- यावेळी वीर नारी सन्मान देशासाठी सर्वोच्च बलिदान दे णाऱ्या शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.
- मॉडर्न इंग्रजी माध्यम हायस्कूलच्या पथकाची शिस्तबद्ध ता, एकसंघपणा, संचलन सुसूत्रता,कमांडरचे नेतृत्व यामु ळे निगडी विभागात प्रथम क्रमांक आला.
- यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापिका गौरी सावंत,प्रो ग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. ग जानन एकबोटे,सहकार्यवाह प्रा.डॉ.जोत्सना एकबोटे, सेक्रे टरी प्रा.डॉ.शामकांत देशमुख, शाळा समितीचे अध्यक्ष दी पक मराठे, व्हिजिटर प्रा.डॉ. अतुल पाठक यांनी केले.
- क्रीडा शिक्षक मधुकर रासकर आणि ममता गाडे यांनी संचलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











