
व्यवसायापलीकडे समाजऋण फेडण्याचा ध्यास; ऐतिहासिक प्रचितगडावर पडला स्ट्रीट लाईटचा प्रकाश.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-“केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे” या उक्तीप्रमाणे, व्यवसायाचा विस्तार करतानाच सामाजिक बांधिलकी जपणे हे खऱ्या उद्योजकाचे लक्षण आहे.

- ‘श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर्स’ तर्फे शिवकालीन प्रचित गडावर नुकतेच १२० वॅटचे सोलर स्ट्रीट लाईट अर्पण करण्यात आले आहेत.
- या उपक्रमाचे मुख्य उद्देश दुर्ग संवर्धन, गडकिल्ल्यांचे जत न आणि संवर्धन कार्यात खारीचा वाटा उचलणे. रात्री अप रात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांची आणि ट्रेकर्सची सोय होणे.
- यासाठी पर्यावरण पूरक सौर ऊर्जेचा वापर करून नैसर्गि क प्रकाशाची व्यवस्था करणे.

- व्यवसाय हा केवळ नफ्यासाठी नसून, समाजाचे आणि आपल्या इतिहासाचे देणे लागतो या कर्तव्य भावनेतून हे कार्य आपल्या हातून पार पडले असल्याचे प्रोप्रायर रुपेश कोलते यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











