
त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा.
- प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :-विश्व समता कला मंच संगमेश्वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत, धम्मक्रांती कलामंच रत्नागि री यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमुर्ती मातारमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘एक रात्र निळ्या पाखरां ची'(पर्व ५ वे) भव्य जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आ योजन करण्यात आले.
- असून सदर स्पर्धा रविवार दि.१५फेब्रुवारी२०२६ रोजी सायं ८ वाजता शुभगंधा मंगल कार्यालय मयुरबाग लोवले, ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे संपन्न होणार आहेत.

- सदर गीतगायन स्पर्धेत प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १८ जलसा मंडळांना संधी दिली जाणार आहे.
- या स्पर्धेचा कालावधी हा १५ मिनिटांचा असून निवेदनास ह माता रमाई व डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या जीव नावर दोन गीते सादरीकरण करावीत.
- गीतगायन स्पर्धेत एका जलसा मंडळामध्ये फक्त १० कला वंतांचा सहभाग असेल. सदर गीतगायन स्पर्धेत इतर जा तीतील कलावंतांचा संघ देखील सहभागी होऊ शकतो.
- या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ९०००/- रू रोख आकर्ष क सन्मानचिन्ह व गौरवपत्र, द्वितीय पारितोषिक ७०००/-रू. आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र तृतीय पारितोषिक ५०००/-रू.आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र उत्तेजनार्थ पारितोषिक (१) २०००/-रूपये आकर्षक सन्मानचिन्ह उत्तेजनार्थ पारितोषिक (२) २०००/-रूपये आकर्षक स न्मानचिन्ह व गौरवपत्र याशिवाय उत्तम ढोलकी वादक ५००/-रूपये आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र उत्तम हार्मोनियम वादक ५००/-रूपये आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र उत्तम गायक ५००/-रूपये आकर्षक सन्मानचि न्ह व गौरवपत्र सहभागी सर्व जलसा मंडळांना आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र दिले जाईल.
- रत्नागिरी जिल्ह्यातील जलसा या लोककलेला प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे.

- रत्नागिरी जिल्ह्यातील जलसाकार मंडळांनी ‘एक रात्र नि ळ्या पाखरांची’ (पर्व ५ वे) या भव्य जिल्हास्तरीय गीतगा यन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. २८ जानेवारी २०२६ पर्यंत मो ८९९९४९४१८३, ८६५७३८५३२३ या भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











