
विरार येथे दि. ७ फेब्रुवारी रोजी प्रथमच होणार गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शनच्या लोकप्रिय नमनाचा प्रयोग.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-रसिक प्रेक्षकांच्या अलोट गर्दी त दिवा येथे पार पडलेल्या प्रयोगा नंतर आता दि. ७ फेब्रु वारी २०२६ रोजी रात्री ठिक ९ वाजता विरार येथे प्रथमच जयकृपा हौसिंग सोसायटी आयोजित श्री सत्यनारायण महापूजे निमित्ताने जयश्री जगन्नाथ नगर येथे गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शनच्या नमनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
- गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शनने अगदी अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

- विरार येथे होणाऱ्या प्रयोगाचे खास आकर्षण म्हणजे स्टा र प्रवाह मराठी वाहिनीवरुन घराघरांत पोहोचलेले लोकप्रि य अभिनेते श्री कमलाकर पानवलकर हे प्रथमच मावशी च्या भूमिकेत दिसणार आहेत.
- या कलामंचला कमी कालावधीत नावारुपाला आणण्या साठी निर्माते विजय चौगुले, प्रदिप उजवकर, निलेश लाड सोबत आशिष गुरव, जयदेव जोगळे, महेश डोंगरकर, सुर ज गुरव, अथर्व पाटोळे, आदित्य निबदे यांच्यासह सर्व क लाकार, संगीतकार आणि मायबाप प्रेक्षकांचे मोलाचे योग दान लाभले आहे.
- विरार येथे होणाऱ्या या नमन कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकां नी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आमंत्रण गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शनने दिले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











