
खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल : जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे.
- प्रतिनिधी : रायगड : प्रमोद तरळ :- मुंबई–गोवा महामा र्गावरील अनेक चुकीच्या व अपूर्ण कामांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत.
- लोणेरे उड्डाणपूल १००% क्षमतेने सुरू झाल्यानंतर विशेष त पहेल खांडपाले फाटा येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
- या ठिकाणी योग्य वाहतूक नियोजन व स्पष्ट संकेत नस ल्याने वाहनचालक संभ्रमात पडत असून जीवितहानीचा धोका वाढत आहे.

- या गंभीर परिस्थितीची दखल घेत जनआक्रोश समितीचे पदाधिकारी श्री. संतोषजी शिंदे यांनी आज स्वतः पुढाका र घेऊन पहेल खांडपाले फाटा येथे ठेकेदारामार्फत सिग्न ल बसवून घेतला.
- त्यामुळे वाहनचालकांना येथे क्रॉसिंग असल्याची स्पष्ट कल्पना येईल व भविष्यातील अपघात टाळण्यास मोठी मदत होईल.
- प्रशासन जिथे अपयशी ठरत आहे, तिथे जबाबदार नागरि क पुढे येत असल्याचे संतोष शिंदे हे जिवंत उदाहरण आहे.
- कर्तव्यदक्ष व जबाबदार नागरिक व कोकणवासीय श्री सं तोष शिंदें. यांच्यासारख्या जागरूक आणि धाडसी नागरि कांमुळेच मुंबई–गोवा महामार्गासाठीचा हा लढा यापुढेही सुरू राहील असा विश्वास मुंबई गोवा महामार्ग जनआक्रो श समितीने व्यक्त केला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











