
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती वर राष्ट्रवादी मित्र पक्षाचे वर्चस्व.
- प्रतिनिधी : माळशिरस : शकील मुलाणी :- माळशिरस तालुक्यात तब्बल ८ वर्षानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या.
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या कार्याची पोहोच पावती देणाऱ्या निवडणुका असल्याने या निवडणुकात प्रचंड चुरस पहायला मिळते.
- परंतु तालुक्यातील काही जिल्हा परिषद गट वगळता अ शी चुरस कोठे पहायला मिळाली नाही.
- माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटात आ.उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर व माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपु ते यांच्या मध्ये सरळ लढत झाली.

- यात जिल्हा परिषद दहिगाव गट :संस्कृती सातपुते भाजप पंचायत समिती गुरसाळे गण – दशरथ शेळके : भाजप 2 दहिगाव गण – सौ.कमल खिलारे विजयी झाले.
- मांडवे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे गौतम माने विरुद्ध भाजपचे धर्मराज माने यांच्यात दुरंगी लढत झाली.

- जिल्हा परिषद मांडवे गट : गौतम माने : राष्ट्रवादी पंचायत समिती गण सौ.सोनल पाटील : राष्ट्रवादी मांडवे गण – सौ.राजश्री पालवे : भाजप विजयी झाले.
- फोंडशिरस जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधा नसभेपेक्षा दोन टक्के कमी मतदानअर्जुनसिंह मोहिते पा टील विरुद्ध भाजपचे हरिदास वाघमोडे यांच्यात मुख्यत्वे करुन लढत झाली.

- जिल्हा परिषद फोंडशिरस गट : अर्जुनसिंह मोहिते पाटील : राष्ट्रवादी पंचायत समिती भांबुर्डी गण – प्रवीण वाघमोडे : राष्ट्रवादी फोंडशिरस गण – सौ.सोनल पाटील : राष्ट्रवादी विजयी झाले.
- संग्रामनगर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुष मा नारनवर विरुद्ध भाजपच्या मेघा कचरे यांच्यात दुरंगी लढत झाली.

- जिल्हा परिषद संग्रामनगर गट सुषमा नारनवर : राष्ट्रवादी, पंचायत समिती मेडद गण – युवराज झंजे : राष्ट्रवादी12 संग्रामनगर गण – निशा गिरमे : राष्ट्रवादी विजयी झाले.
- माळीनगर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे मारुती लोंढे विरुद्ध भाजपचे नागेश तुपसौंदर्य यांच्यात मुख्यत्वे लढत झाली.
- जिल्हा परिषद माळीनगर गट : मारुती लोंढे : राष्ट्रवादी, पं चायत समिती लवंग गण – सौ.ऋतुजा पराडे : भाजप मा ळीनगर गण – महादेव साबळे विजयी झाले.

- बोरगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नागनाथ भोसले विरुद्ध भाजपचे संजय साठे यांच्यात मुख्यत्वे करु न लढत झाली.
- जिल्हा परिषद बोरगांव गट : नागनाथ भोसले : राष्ट्रवादी, पंचायत समिती बोरगांव गण – मनिषा नाईकनवरे, राष्ट्रवा दी जांबूड गण – आप्पासाहेब पाटील : राष्ट्रवादी विजयी झाले.

- वेळापूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना क्षी सरतापे विरुद्ध भाजपच्या प्रेरणा खंडागळे यांच्यात दुरंगी लढत झाली.
- जिल्हा परिषद वेळापूर गट : मिनाक्षी मिलींद सरतापे : रा ष्ट्रवादी,पंचायत समिती वेळापूर गण – सौ.विमल जानकर : राष्ट्रवादी यशवंतनगर गण – सौ.वैष्णवी मोहिते-पाटील : राष्ट्रवादी निमगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या नीला वती ठवरे विरुद्ध भाजपच्या ज्योती ठवरे यांच्यात मुख्यत्वे लढत झाली.

- जिल्हा परिषद निमगांव गट :निलावती मच्छिंद्र ठवरे :शिव सेना (शिंदे गट धनुष्यबाण),पंचायत समिती निमगांव गण – दत्तात्रय रावसो मगर : शिवसेना (शिंदे गट धनुष्यबाण) 16 गोरडवाडी गण – रेश्मा जगन्नाथ माने : शिवसेना (शिंदे गट धनुष्यबाण) विजयी झाले.
- पिलीव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित सिंह जाधव विरुद्ध भाजपचे चंद्रकांत जाधव यांच्या मध्ये मुख्यत्वे करुन लढत झाली.

- जिल्हा परिषद पिलीव गट :चंद्रकांत जाधव : भाजपा,पंचा यत समिती पिलीव गण – नम्रता शिवराज पुकळे : भाजपा तांदुळवाडी गण – मनिषा पाटील : राष्ट्रवादी विजयी झाले.
- एकंदरीतच विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहि ली तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जिल्हा परिषद व १३ पंचा यत समिती गणात आघाडी मिळाली होती. तर भाजपला तीन जिल्हा परिषद गटात व पाच पंचायत समिती गणात आघाडी मिळाली होती.

- आज तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणाची मतमोजणी झाली असून जिल्हा परिषद महाविकास आघाडी सात व भा ज पा मित्रा पक्ष दोन जा गेवर तर पंचायत समिती महाविकास आघाडी बारा व भा ज पा मित्र पक्ष सहा जागेवर निवडून आले आहेत. पंचाय त समितीवर राष्ट्रवादी मित्र पक्ष निर्विवाद वर्चस्व राखले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











