
कोकणातील प्रसिद्ध नमन,जाकडी लोककलावंत श्रीकांत बोंबले यांची रत्नागिरी आकाशवाणीवर विशेष मुलाखत.
- प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- कोकण कलेची पंढरी म्हणून ओळखली जाते नमन,जाकडी अशा लोकक ला अनेक कलावंत आपापल्या परीने जोपासत असतो.
- अशीच विविध लोककलांचे जतन, संवर्धन, प्रचार व प्रसार करण्यासाठी तन मन धनाने गेली १४ वर्षे झटणारे ता.जि. रत्नागिरी येथील हातखंबा, बोंबलेवाडीतील अवलिया,अष्ट पैलू कलाकार श्री.श्रीकांत बोंबले यांची १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता पूर्णिमा साठे यांनी मुलाखत घेतली.

- शाहीर श्री बोंबले हे गेली १५ वर्षे नमन,जाकडी लोककला तून कार्यरत आहेत नवतरुण उत्साही मंडळ,बोंबलेवाडी, स्वयंभु महालक्ष्मी नमन कोतवडे, रवळनाथ रिमिक्स रत्ना गिरी लयभारी, अंबिका नमन ओरी तिवराड आदी विविध मंडळांच्या माध्यमातून ते आपली कला जोपासत आहेत.
- गेल्या १४ वर्षांत त्यांनी जवळपास २००० प्रयोगाचा टप्पा पार केला आहे. त्यांनी केलेल्या नारद, विष्णू,सुदामा, शंक र, ब्रम्हदेव अशा विविधांगी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
- त्याशिवाय “रंग भरु दे आमुच्या गणा”, माझ्या अंगणी ना चते दुसऱ्याची बायको”, ” यहीं तो लाईफ है बाॅस” या नाट कांमध्ये महाराज, प्रवासी, दुकानदार अशा अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत.
- या नाटकांचे ५० प्रयोग झाले आहेत शाहीर श्रीकांत बोंब ले हे कोकण नमन कलामंच रत्नागिरी (रजि) या संस्थेचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











