सनराईज इंग्लिश मेडीयम स्कूल, शेळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील शेळगाव येथील सनराईज इंग्लिश मेडीयम स्कूलचा वार्षि क स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.
  • कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, छत्रप ती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आं बेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
  • कार्यक्रमाचे उद्घाटन आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो लीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड, अँड.सुभाषराव मोरे तसे च संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष जोतीराम नवनाथ जगताप यांच्या हस्ते झाले.
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संभाजी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश शिंदे यांनी तर अनुमोदन राहुल शिंदे यांनी दिले. आभार प्रदर्शन ज्योती बोराडे, श्री राम गुंड यांनी मानले.
  • स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
  • देशभक्तीपर गीत, कोळी नृत्य, धनगर गीत, मराठी व हिंदी गीतांवरील नृत्य तसेच पारंपरिक लोकनृत्यांनी वातावरण भारावून गेले.
  • विशेष आकर्षण ठरले ते ‘छावा’ चित्रपटावर आधारित छ त्रपती संभाजीराजे यांच्या कैदेवरील प्रभावी थीम सादरीकरण.
  • या सादरीकरणाला पालक व उपस्थितांकडून उत्स्फूर्त टा ळ्यांचा कडकडाट मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरी करणाबद्दल पालकांनी भरघोस बक्षिसांचा वर्षाव करून त्यांचे कौतुक केले.
  • यावेळी पुणे येथील युवा उद्योजक प्रकाश अल्लाट, परमा नंद हुर्डूले, राहुल चोबे, तुषार गायकवाड, माणिकबाबा वि द्यालयाचे प्राचार्य पांडुरंग कुमटकर, माजी प्राचार्य गुरुदास काळे, केंद्रप्रमुख बबन गवळे, गोरख मोरजकर, निशिकांत क्षीरसागर, रोहिदास मोहिते, केंद्रीय मुख्याध्यापक सुभाष देवकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दादा दैन यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील मा न्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्ष क, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणां ना व्यासपीठ मिळाल्याने कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles