
भाषा जपली तरच आपली परंपरा, इतिहास जिवंत राहतो – संजय कुळये.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आ जपर्यंत अनेक साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली.
- भाषा ही संस्कृतीचा आरसा असते.मराठी भाषा जपली तर आपली परंपरा, लोककला, लोकगीत आणि इतिहास जिवंत राहतो असे प्रतिपादन ओणी येथील प्रसिद्ध कवी व गझलकार संजय कुळये यांनी केले ते आबासाहेब मरा ठे महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा गौरव दिवस कार्यक्रमात बोलत होते.

- यावेळी कुळये यांनी हरवलेला गाव,शाळा, आकाश, बुध्द वाटणी या आशयघन कवितांचे सादरीकरण करून विद्या र्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
- काही प्रेम विषयक व सामाजिक जीवनावर भाष्य करणा ऱ्या गझलांचेही सादरीकरण केले.
- या प्रसंगी तृप्ती मेजारी, तेजस्वी सावंत,सेजल आंबेलकर, अनुष्का पंगेरकर या विद्यार्थिनीनी कविता सादर करून विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली.
- अध्यक्षीय मनोगता मध्ये डॉ अतुल भावे यांनी मराठी भाषे ची परंपरा,संस्कृती, थोरवी किती अवीट आहे याबद्दल आ पले विचार व्यक्त करुन मराठी भाषेवर कितीही परकीय भाषांची आक्रमणे झाली तरी मराठी भाषेचे स्थान अभेद्यच राहील.
- त्यामुळे आपण आपल्या मराठी भाषेला जपले पाहिजे असे आवाहन केले.
- या कार्यक्रमात प्राचार्य डॉ राजाराम राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर सेवक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











