परंडा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान सुरू; नागरिकांच्या समस्या थेट मंडळ स्तरावर सोडविणार : तहसीलदार निलेश काकडे.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार परंडा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभि यान” आयोजित करण्यात येत असून, या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित वि विध समस्या थेट मंडळ स्तरावर सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • राज्य शासनाने नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा आ णि लाभ घरपोच व एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत,या साठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंडळ स्तरावर शिबिरे घेऊन नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणे नि काली काढण्यावर भर दिला जाणार आहे.
  • महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबं धित विभाग असल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध अडचणी व कागदपत्रां शी संबंधित प्रश्न सोडविणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
  • त्यामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याचा प्रयत्न या अभियानातून कर ण्यात येत आहे.
  • मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक परंडा तालुक्यात ७ मा र्च २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत विविध महसूल मंडळांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
  • आसू मंडळ – ७ मार्च २०२६
  • जवळा (नि.) मंडळ – १४ मार्च २०२६
  • आनाळा मंडळ – २८ मार्च २०२६
  • शेलगाव मंडळ – ११ एप्रिल २०२६
  • सोनारी मंडळ – १८ एप्रिल २०२६
  • परंडा मंडळ – ८ मे २०२६
  • पाचपिंपळा मंडळ – १५ मे २०२६
  • शिबिरांमध्ये मिळणाऱ्या प्रमुख सेवा या शिबिरांमध्ये मह सूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
  • त्यामध्ये प्रामुख्याने —
  • प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे,
  • ७/१२ उताऱ्यांमधील त्रुटी दुरुस्ती
  • डिजिटल ७/१२ संदर्भात मार्गदर्शन
  • सर्वांसाठी घरे अंतर्गत घरपट्टे वाटप
  • लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत उत्पन्न,
  • रहिवासी, जात इत्यादी प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकृती व वाटप एक खिडकी योजनेअंतर्गत नागरिक सुविधा, ई-मोजणी, ऑक्शन, पीएम किसान योजना आणि तक्रार निवारण भू-संपादन व अकृषक परवानगी प्रकरणांबाबत मार्गदर्शन, नवीन शासन निर्णयानुसार अकृषक तरतुदींबा बत माहिती, तुकडेबंदी कायद्यांतर्गत व्यवहारांची माहिती
    बळीराजा पाणी शेततळे योजनेबाबत मार्गदर्शन सामाजि क अर्थसहाय्य योजनांचे अर्ज स्वीकृती व मंजुरी आदेश वितरण पोस्ट ऑफिसच्या नाविन्यपूर्ण विमा योजनांबाबत मार्गदर्शन तहसीलदार परंडा यांनी तालुक्यातील नागरिकां ना आवाहन केले आहे.
  • या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आप ल्या समस्या थेट शिबिरात मांडाव्यात आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
  • अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ अधिकारी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
  • या अभियानामुळे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, तालुक्यातील नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठर णार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles